Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : भाताच्या पेंढ्याचा शेतकऱ्यांना हातभार

Paddy Harvesting : भात हे मुख्य पीक असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत सध्या कापणीचा हंगाम मध्यावर आला आहे. अनेक ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी कापणी केलेल्या कमी दिवसांच्या पिकांची झोडणीही सुरू आहे.

Team Agrowon

Mumbai News : भात हे मुख्य पीक असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत सध्या कापणीचा हंगाम मध्यावर आला आहे. अनेक ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी कापणी केलेल्या कमी दिवसांच्या पिकांची झोडणीही सुरू आहे. झोडणीनंतर भात पिकाचा उरलेल्या पेंढ्याला (पाओली) समाधानकारक दर मिळत आहे.

तसेच यातून मिळणाऱ्या रोख उत्पन्नातून केलेली कापणी, झोडणी आदीच्या खर्चातून शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. यामुळे शेतकरी आता पूर्वीप्रमाणे पेंढा तयार करण्याच्या भानगडीत न पडता झोडणीच्या खळ्यातून पाओलीची विक्री करत आहे.

भातशेतीच्या झोडणीनंतर उरलेल्या तणाच्या बांधलेल्या पाओलीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची तजवीज होत आहे. त्यामुळे त्याचा खर्चाला चांगला हातभार लागतो; मात्र मागील काही वर्षांत दरवाढ न झाल्याने आणि हवा तसा दर नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खर्चाचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

यामुळे शेतकऱ्यांपुढे झोडणी, मळणी यासाठी लागणाऱ्या आर्थिक हातभाराला कात्री लागली होती.पेल्हार, शेलार, भिवंडी येथील गोठे आणि मुंबईतील दुग्धउत्पादकांकडून या भाताच्या पाओलीला मोठी मागणी असते. सध्या जिल्ह्यात भात पिकांच्या झोडण्या सुरू झाल्या आहेत.

दिवाळीनंतर मात्र या झोडण्यांच्या कामांना वेग येणार आहे. या झोडण्यांनंतर उरलेल्या भाताच्या तणापासून गठ्ठे तयार करून शेतकरी विक्री करत असतात. याला ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पाओली असे संबोधले जाते. भिवंडी, वसईसह मुंबईतील खासगी दुग्धउत्पादकांकडून पाओलीला मागणी असल्याने या मोसमात पाओली पुरवठा करणाऱ्यांनाही रोजगार मिळत आहे.

यंदा १८०० रुपयांचा दर

सद्यस्थितीत शेतकऱ्यांना ५०० किलो पाओलीला १५०० ते अठराशे रुपयांचा भाव मिळत आहे. या पाओलीची मुंबई, ठाण्यासह भिवंडी तालुक्यातील तबेल्यांमध्ये विक्री केली जात आहे. या पाओलीच्या विक्रीतून हातात रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Issue: उत्तरेकडील पावसाने केळी बाजाराला फटका

Fish Price: मासळीच्या दरात सुधारणा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीतील ‘सप्लाय व्हॅलिड’ एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात

Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ

Bedana Demand: बेदाण्याला मागणी, उठाव कमी

SCROLL FOR NEXT