Soybean Harvesting : सोयाबीन कापणी, मळणी करताना काय काळजी घ्यावी?

Soybean Threshing : सोयाबीन बियाण्याचे आवरण हे अत्यंत पातळ व नाजूक असते. त्यामुळे इतर पिकाच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर खराब होऊ शकते. त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
Soybean Harvesting
Soybean Harvesting Agrowon
Published on
Updated on

सध्या सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे.  योग्य वेळी जर सोयाबीनची काढणी केली नाही तर बियाण्यांची प्रत खालावण्याची शक्यता असते. बरेच शेतकरी सोयाबीन पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरतात.  सोयाबीन बियाण्याचे आवरण हे अत्यंत पातळ व नाजूक असते.

त्यामुळे इतर पिकाच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर खराब होऊ शकते. त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

कापणी करताना काय काळजी घ्यायची?

सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागल्यावर आणि शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट झाल्यानंतर पीक कापणीला आलय अस समजाव. वाणाच्या पक्वतेनुसार साधारणत: ८० ते ८५ टक्के शेंगा वाळल्यानंतर पिकाची कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ ते १७ टक्के असाव. सोयाबीनची पाने पिवळसर होऊन शेंगा तांबूस रंगाच्या झाल्यानंतर दाण्यातील ओलावा १५ ते १७ टक्के झालाय असं समजाव.

पावसाचे वातावरण असल्यास किंवा वातावरणात जास्त ओलसरपणा असल्यास सोयाबीनची कापणी टाळावी. कापणी झाली असल्यास गंजी ताडपत्रीने व्यवस्थितपणे झाकावी.  दुपारच्या वेळी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास ताडपत्री काढून गंजी फोडून सुकू द्यावी. त्यामुळे शेंगेतील दाणे कुजणार नाहीत. वाण व प्लॉटनिहाय वेगवेगळी कापणी व मळणी करावी.ओल्या झाडांची गंजी लावू नये. गंजीमध्ये ओले किंवा हिरवे झाडे ठेवू नयेत.

Soybean Harvesting
Animal Vaccination : जनावरांचे लसीकरण करताना काय काळजी घ्यावी?

मळणी करताना काय काळजी घ्यायची?

कापलेले पीक मळणी खळ्यावर आणून सुकू द्यावे. त्यामुळे दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १३ टक्क्यांपर्यंत येईल. मळणी करताना मळणी यंत्रामध्ये सोयाबीन लावण्याचा वेग एकसारखा असावा, त्यामुळे बियाण्याला मार लागणार नाही. जर मळणी करताना बियाण्याची फूट होत असेल, तर थ्रेशिंग ड्रममधील काही स्टड किंवा नट कमी करावेत. तयार झालेले बियाणे ओलसर असल्यास सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आल्यास वाळवणे थांबवावे. बियाणे दाताखाली घेऊन दाबल्यानंतर ते टीचकते अशावेळी बियाण्यातील ओलावा योग्य आहे असे समजावे.

बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास बियाणे जास्त तापमानात वाळवू नये, यामुळे उगवणक्षमता झपाट्याने कमी होऊ शकते. बियाण्यात जास्त ओलावा असेल तर बियाणे उन्हात न वाळवता सावलीत हवेशीर जागी वाळवावे. बियाणे उन्हात वाळवतेवेळी पक्क्या फरशीवर न वाळवता पातळ ताडपत्रीवर वाळवावे. अशा प्रकारे सोयाबीनची कापणी मळणी करताना काळजी घेतल्यास होणार नुकसान टाळता येतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com