Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : कंत्राटदार, उद्योगपती सरकारचे ‘लाडके मित्र’

Politics Update : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार फसव्या योजनांचा पाऊस पाडत आहे. मात्र, वास्तवात सरकार कंत्राटदार, उद्योगपतींसाठी ‘लाडका मित्र’ योजना राबवून मुंबईला ‘अदानी सिटी’ करण्याचा घाट घालत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता.२०) केली.

Team Agrowon

Mumbai News : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार फसव्या योजनांचा पाऊस पाडत आहे. मात्र, वास्तवात सरकार कंत्राटदार, उद्योगपतींसाठी ‘लाडका मित्र’ योजना राबवून मुंबईला ‘अदानी सिटी’ करण्याचा घाट घालत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता.२०) केली.

शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकार फसव्या योजनांचा पाऊस पाडत आहे. सरकारला असे वाटते आहे, की या योजनांना लोक भुलतील. फसव्या योजनांच्या धुरळ्यामागे ते कंत्राटदार मित्रांचे भले करू इच्छितात. सरकारने ‘लाडका मित्र’ योजनाही आणली आहे.

धारावी पुनर्विकासात जोवर ५०० चौरस फुटांचे घर मिळत नाही तोवर तेथे पुनर्विकास होऊ दिला जाणार नाही. मुंबई अदानीला आंदण दिले जात आहे. मुंबईला भिकेला लावून टेंडरमध्ये नसलेल्या गोष्टी दिल्या जात आहेत.

कुर्ला येथील दुग्धशाळेची जमीन, दहिसर टोलनाका, मुलुंडची जागा, मिठागरासह २० जागा अदानी समूहाला दिल्या जात आहेत, हीच ‘लाडका मित्र’ योजना आहे. धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही तर ती इंडस्ट्रिअल इस्टेट आहे. तेथे प्रत्येक घरात लघुउद्योग चालतो. त्यांच्यावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मोदी आणि शहा हे दोघे मुंबईला ‘अदानी सिटी’ करणार आहेत. कदाचित ते मुंबईचे नाव बदलून ‘अदानी सिटी’ असेही करतील. मुंबईला भिकेला लावण्याचे हे कारस्थान आहे.’’

‘वरळी डेअरीची जागाही अदानींच्या घशात ’

वरळी डेअरीची जमीनही अदानी समुहाच्या घशात घालण्यात येणार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दूध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला दिले जातात आणि महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करीत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही,’’ असे नाना पटोले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT