Jal Jeevan Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन योजनेच्या कंत्राटदारास अडीच कोटींचा दंड

Water Crisis Amaravati : या योजनेच्या कंत्राटदाराने काम पूर्ण करण्यात केलेली दिरंगाई यास कारणीभूत असल्याचे समोर आले असून त्याला प्रतिदिन ५५ हजार रुपये इतका दंड करण्यात आला आहे.

Team Agrowon

Amaravati News : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०५ गावे वाढीव पाणीपुरवठा योजना रखडल्याने या गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या योजनेच्या कंत्राटदाराने काम पूर्ण करण्यात केलेली दिरंगाई यास कारणीभूत असल्याचे समोर आले असून त्याला प्रतिदिन ५५ हजार रुपये इतका दंड करण्यात आला आहे.

आतापर्यंत त्याला २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. तिवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखडे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडत अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीवर लक्ष वेधले. यामध्ये तिवसा तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये ही योजना जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर करण्यात आली होती. मजीप्राने केलेल्या करारनाम्यानुसार ही योजना जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु सद्यःस्थितीत या योजनेची भौतिक प्रगती ५२ टक्के व आर्थिक प्रगती ६० टक्के झाली आहे.

योजना पूर्ण करण्यात कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्याचे आमदार राजेश वानखडे यांनी सभागृहासमोर मांडले. मात्र या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. आमदार वानखडे यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्र्यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्याला प्रतिदिन ५५ हजार रुपये दंड करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT