Agriculture Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing Delay: सततच्या पावसाने शेतीकामे ठप्प

Wet Drought: खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी शेतीची कामे करता येत नसल्याचे चित्र असून सततच्या पावसाने शेतांमध्ये वापसा नाही. शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात गवत उगलवलेले आहे.

Team Agrowon

Pune News: वाडा मंडल कार्यक्षेत्रातील वाडा, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, कडधे, कान्हेवाडी, कमान, चास, पापळवाडी, आखरवाडी चास व परिसरातील अनेक गावांमध्ये मे महिन्यापासून सलगपणे पाऊस सुरू आहे. अजूनही पाऊस कोसळतोच आहे. खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी शेतीची कामे करता येत नसल्याचे चित्र असून सततच्या पावसाने शेतांमध्ये वापसा नाही. शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात गवत उगलवलेले आहे.

दरम्यान, बटाटा पिकाची लागवड रखडली आहे तर हंगामातील कांदा लागवडी उशिरा होणे शेतकऱ्यांना परवडणार नसल्याने खरीप हंगाम गेल्यात जमा आहे. शेतांमध्ये पाणी साचून राहत असल्याने दलदल तयार झाली आहे. सततच्या पावसाने पेरणी करता येत नसून आता जरी पाऊस थांबला तरी पंधरा दिवस शेतात दलदलीमुळे काम करणे शक्य होणार नाही. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वाडा मंडळ कार्यक्षेत्रात खरिपाच्या केवळ दहा ते पंधरा टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

पिकांची वाढ खुंटली

पेरण्या झालेल्या ठिकाणी बियाणे उगवलेले नाही, काही ठिकाणी पेरले पण पिकांची वाढ खुंटली आहे. पिके पिवळी पडली असून झालेली पेरणीही निरर्थक ठरली असल्याने या परिसरातील तसेच पापळवाडीतील नंदू शिंदे, गणेश घनवट, विठ्ठल गावडे, रामदास घनवट, अवधूत पवार, महादू पवार, राजेंद्र घनवट, शंकर घनवट यांसह अन्य शेतकऱ्यांनी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

खरिपाची स्थिती चिंताजनक आहे. खरीप हातचा गेल्यात जमा आहे. शेतात उन्हाळी पिके उभी असून, काढणी करता येत नसल्याची स्थिती आहे. केवळ दहा ते पंधरा टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झालेल्या असून बाकी पेरण्या रखडल्या आहेत. पेरण्या झालेल्या पिकांची स्थितीही चांगली नसून पिकांची वाढ खुंटलेली आहे. पावसाने सोयाबीनची वाढ होत नसून पिके पिवळी पडण्यास खुंटली आहे.
संदीप आहेर, कृषी सहायक अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT