Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Update : वाणिज्यिक, शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज

Team Agrowon

Nashik News : येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५ एमव्हीए क्षमतेच्या नवीन उपकेंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघून वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना अखंड वीज मिळणार आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

बल्हेगाव (ता. येवला) येथे ५ एमव्हीए क्षमतेच्या नवीन ३३/११ विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, उप अभियंता मिलिंद जाधव, सरपंचा सुशिला कापसे, उपसरपंच जालिंदर कांडेकर, बाळासाहेब कापसे, वसंत पवार, दीपक लोणारी, मीराबाई कापसे, नवनाथ काळे, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, सुनील पैठणकर, शंकरराव निकाळे, दत्ता जमधडे यांच्यास‍ह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, की बल्हेगाव, वडगाव आणि नागडे या परिसरातील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना ३३/११ के.व्ही. येवला शहर उपकेंद्रातून ११ के.व्ही. अंदरसुल व ११ के.व्ही. नगरसुल वाहिनीद्वारे वीज पुरवठा होत आहे. परंतु रब्बी हंगामात फीडर ओव्हरलोड होत असल्याने विविध कारणाने वीजपुरवठा खंडित होत होता. म्हणून ३३/११ के.व्ही. बल्हेगाव उपकेंद्राची निर्मिती एक आवश्यक बाब म्हणून प्रस्तावित होती. या उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. असून याच्या उभारणीसाठी ३६७.८८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

बल्हेगाव वीज उपकेंद्रासाठी वडगाव-बल्हे ग्रुप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन त्यांच्यकडील गट नंबर १ /‘अ’मधील ३४ आर जागा महावितरण कंपनीला दिलेली आहे. या उपकेंद्रातून १०० एमपीअर क्षमतेचे दोन शेतकीसाठीचे फिडर (१) बल्हेगाव (२) नागडे आणि एक गावठाण असे तीन फिडर तयार होतील.

या उपकेंद्रातील विजेचा लाभ बल्हेगाव, नागडे आणि धामणगाव येथील गाव व शिवार तसेच वडगाव आणि कोटमगाव येथील गावठाणाच्या परिसरातील घरगुती/वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी या वेळी दिली. बल्हेगाव विद्युत उपकेंद्राचे काम येत्या दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : शेतकरी म्हणून निवडून आलेले सभापती हुडेंसह पाच जण अपात्र

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Crop Damage Survey : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट; ई-पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT