Sand Agrowon
ॲग्रो विशेष

Maha Awas Abhiyan : क्रश सॅंडद्वारे ११ हजार ८६६ घरकुलांचे बांधकाम

Gharkul scheme : सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलाव मागील चार- पाच वर्षांपासून बंदच आहेत. त्यामुळे घर बांधकामासाठी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील वाळू लिलाव मागील चार- पाच वर्षांपासून बंदच आहेत. त्यामुळे घर बांधकामासाठी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर मात करीत जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ८६६ बेघर कुटुंबांनी स्वप्नातील निवारा पूर्ण करण्यासाठी क्रश सॅंड वापरून बांधकामे पूर्ण केली. त्यामुळे ‘महा-आवास अभियान’अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि आता मोदी आवास योजना, या माध्यमातून राज्यातील बेघरांना हक्काचे घरकुल बांधणीसाठी सव्वालाखांपर्यंत अर्थसहाय केले जाते. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ५२ हजार लाभार्थींना त्याचा लाभ झाला असून त्यांचे घरकूल पूर्ण झाले आहे.

राज्य सरकारने २०२१-२२ या वर्षात ‘महा-आवास अभियान’ राबविले. त्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलांचे बांधकाम करताना वाळू नसल्याने काम न थांबविता लाभार्थींनी क्रश सॅंड, सिमेंट ब्लॉक, फ्लाय ॲश, इंडर लॉकींग, हॉलो ब्रिक्सचा वापर केला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही लाभार्थींना क्रश सॅंड व वाळू, यातील फरक दाखवून दिला. त्यानंतर वाळूची वाट न पाहता क्रश सॅंड वापरून जिल्ह्यातील ११ हजार ८६६ जणांनी घराचे बांधकाम पूर्ण केले.

११ हजार ३५४ लाभार्थींकडून घरांची सजावट

वर्षानुवर्षे पडक्या घरात किंवा झोपडीत राहणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचा मजबूत निवारा मिळाला. स्वप्नातील घरकुल साकारल्यानंतर ११ हजार ३५४ लाभार्थींनी स्वत:हून खर्च करीत रंगरांगोटी, फरशी, किचन गार्डन, परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा साधने बसविली.

६०० रुपये ब्रासची वाळू गेली कोठे?

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सर्वसामान्यांना विशेषत: घरकूल लाभार्थींना घर बांधकामासाठी स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ऐतिहासिक निर्णय घेतला. ६०० रुपयांत एक ब्रास वाळू मिळणार असल्याने अनेकांनी त्या निर्णयाचे कौतुक केले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर वगळता इतर १० तालुक्यांमधील १० हजार बेघर लाभार्थींना ५० हजार ब्रास वाळूची गरज आहे. अजूनही त्यांना स्वस्तातील वाळू मिळालेली नाही, हे विशेष.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT