CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Constitution Building : प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

CM Eknath Shinde : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

स्थानिक टीव्ही सेंटर चौकात रविवारी (ता. ११) मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. टीव्ही सेंटर मैदानावर आयोजित या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव,

राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी सुंदर असे बुद्ध विहार, विपश्यना केंद्र उभारणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारतो आहोत. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय, रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट, तारांगण सेंटर, मागास उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करणे असे विविध उपक्रम राबवत आहोत. यातून प्रेरणा मिळावी हा हेतू आहे.

यंदाच्या बजेटमध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी ४५ हजार कोटी तर राज्यातील माझ्या भगिनींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवा कार्यप्रशिक्षण, वर्षाला तीन सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली. मुलींचे संपूर्ण शिक्षण मोफत केले.

दुर्बलांना मदत करणे, त्यांचे जीवन आनंदी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मुंबईत इंदू मिल इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. बार्टी, सारथी, महा ज्योती, अमृत, टीआरटीआय या संस्थाच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गौतम खरात यांनी प्रास्ताविक केले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

जळगाव-जालना या महामार्गासाठी ३५५२ कोटींचा हिस्सा

पर्यटनाला चालना देणाऱ्या जळगाव-जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्या वतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली. सर्वांच्या हिताचा विचार करणारा शहर विकास आराखडा आपण तयार करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT