Vijay Wadettiwar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील पक्षांचे १२५ जागांवर एकमत

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत २८८ पैकी १२५ जागांवर एकमत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (ता.११) नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला आहे.

Team Agrowon

Nagpur News : विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत २८८ पैकी १२५ जागांवर एकमत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (ता.११) नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत उर्वरित १६३ जागांबाबत मतभेद आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी जागा वाटपाबाबत आघाडी घेतली होती. जागा निश्‍चित झाल्याने प्रचारालाही अपेक्षित वेळ मिळाला. त्याचा महाविकास आघाडीतील पक्षांना फायदा देखील झाला. याउलट जागा वाटपबाबात तिढ्यात अडकलेल्या महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांना नुकसान सोसावे लागले.

किंबहुना, लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा जबर फटका बसला. त्यानंतर आता विधानसभेत देखील महायुतीसमोर अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीतही अनेक जागांबाबत मतभेद असल्याचे श्री. वडेट्टीवार यांच्या वक्‍तव्यानंतर स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत सांगली व मुंबई उत्तर तसेच मध्य या जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच झाली होती. त्यात मुंबईची जागा ठाकरे गटाने काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी सोडली. त्या मोबदल्यात सांगलीची जागा त्यांनी आपल्याकडेच ठेवली होती. सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली आणि जिंकली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही या जागांवरून पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

विकास आघाडीची जागा वाटपाची बैठक गणेशोत्सवानंतर होणार आहे. एकूण २८८ पैकी १२५ जागांबाबत कोणताच वाद नाही. उर्वरित जागांचा तिढा बैठकीतून सुटेल, असा विश्‍वास वडेट्टीवार यांनी व्यक्‍त केला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेकडून मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे वक्‍तव्य केले होते. त्यावर बोलताना उमेदवारीत हिंदू, मुस्लिम असा भेदाभेद करता येत नाही. शिवसेनेची तयारी असल्यास गैर काहीच नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवारांचा परतीचा प्रवास सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी या वेळी बोलताना केला. महायुतीच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत एकदाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाहिले नाही. सर्वांचेच चेहरे पडलेले होते. त्यावरूनच अजित पवार यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रवासापूर्वी पदरात काय पाडून घेता येते यासाठी श्री. पवार प्रयत्नशील असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Disease : खारपाण पट्ट्यात कपाशीवर ‘स्पोडोप्टेरा’चा प्रादुर्भाव

Anil Daunde : प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा द्याव्यात

Electricity Bill : खेडमधील १९ हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले माफ

Paddy Crop Harvesting : भात पीक काढणीची लगबग

CM Eknath Shinde : महायुतीच्या योजना चोरून बनवला वचननामा : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT