New Delhi News : गलवान खोऱ्यात भारताचे जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटींच्या चौथ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत काँग्रेसने मोदी सरकारच्या चीनविषयक धोरणावर कडाडून हल्ला चढवला आहे. पाच मे २०२० पूर्वीच्या स्थितीवर परत येण्यासाठी सरकार काय करते आहे, चीनबद्दलचे धोरण अपयशी ठरल्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी कधी घेणार, असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.
लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता. ७) होणार असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवेदन जारी करून चीनशी असलेल्या तणावावरून सरकारला लक्ष्य केले आहे.
या निवेदनात म्हटले, आहे, की पूर्व लडाखमधील पँगॉन्ग त्सो भागातील गलवान खोऱ्यात १५ जून २०२० ला झालेल्या हिंसक झटापटीमध्ये २० सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. परंतु, त्या घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत पंतप्रधानांनी आपल्या सीमेमध्ये कोणीही घुसखोरी केली नसल्याचे सांगून चीनला प्रशस्तीपत्र दिले.
पूर्व लडाखमधील आपल्या २००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनने कब्जा केला आहे. चार वर्षांत लष्करी पातळीवरील वाटाघाटींच्या २१ फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. भारतीय सैनिक पाच मे २०२० पूर्वी निर्धोकपणे जात असलेल्या ६५ गस्तीच्या ठिकाणांपैकी २६ ठिकाणांवर आता जाऊ शकत नाहीत.
घुसखोरी वाढली
चीनबाबातच्या सरकारच्या धोरणाबद्दल टीका करताना या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे चीन भारताबाबत अधिक आक्रमक भूमिका घेत आहे. दुसरीकडे चीनवर भारताचे आर्थिक अवलंबित्व वाढत आहे. ताबारेषेवर तयार केलेले बफर झोन भारतीय हद्दीत आहेत. भारतीय मेंढपाळ, गुराखी यापुढे हेल्मेट टॉप, मुक्पा रे, रेझांग ला, रिन्चेन ला, टेबल टॉप आणि चुशुलमधील गुरुंग हिलपर्यंत तसेच -हॉट स्प्रिंग्स परिसरातील तीन गस्तीच्या ठिकाणांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. चीनची आक्रमकता आणि घुसखोरी केवळ लडाखपुरती नव्हे तर अरुणाचल प्रदेश, सिलिगुडी कॉरिडॉरपर्यंत वाढली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.