PM Modi on BJP Manifesto : 'भाजपचे पहिले उद्दिष्ट तरूण, महिला, शेतकरी आणि गरीबांची उन्नती' : पंतप्रधान मोदी

BJP Launched Manifesto : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील मुख्यालयात 'संकल्प पत्र' प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी, 'गरीब, खेडे आणि समाजाच्या तळा-गाळातील लोकांसाठी आमचे सरकार समर्पित असेल', असे मोदी यांनी म्हटले आहे.
PM Modi on BJP Manifesto : 'भाजपचे पहिले उद्दिष्ट तरूण, महिला, शेतकरी आणि गरीबांची उन्नती' : पंतप्रधान मोदी

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधूमाळीत भारतीय जनता पक्षाने (BJP) आपला निवडणूक जाहीरनामा रविवारी (ता.१४) जनतेसमोर ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील मुख्यालयात 'संकल्प पत्र' प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मोदी म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती असून अशा शुभ मुहूर्तावर भाजपने आपला विकसित भारताचा जाहीरनामा देशासमोर ठेवला आहे. हा जाहीरनामा चार स्तंभांवर आधारित असून यात युवाशक्ति, नारीशक्ति, गरीब आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच लोकांचे जीवनमान आणि गुंतवणूक आणि नोकऱ्या निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट असेल'.

यावेळी मोदी यांच्या हस्ते जाहीरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेतील एका लाभार्थ्याला देण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले, भाजपचे पहिले उद्दिष्ट तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांच्या उन्नतीचे आहे. यासाठी गेली १० वर्षांत प्रयत्न करण्यात आले असून पुढे ही ते सुरू राहतील. २०२७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा आमचा संकल्प असून यादृष्टीने हा जाहीरनामा एक रोडमॅप आहे. तर आम्ही संपूर्ण गावाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देत आहोत. गरीब, खेडे आणि समाजाच्या तळा-गाळातील लोकांसाठी आमचे सरकार समर्पित आहे आणि असेल. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ देशातील १० कोटी शेतकऱ्यांना मिळत असल्याचेही मोदी म्हणाले.

PM Modi on BJP Manifesto : 'भाजपचे पहिले उद्दिष्ट तरूण, महिला, शेतकरी आणि गरीबांची उन्नती' : पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : दहशतवाद, नक्षलवादाला पोसण्याचे काम काँग्रेसने केले

तसेच '७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्धास आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणण्याचा भाजपचा संकल्प आहे. मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो. त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाईल', असेही मोदी म्हणाले. तर 'आमच्या सरकारने गरिबांसाठी ४ कोटी पक्की घरे बांधली असून आणखी ३ कोटी घरे बांधण्याचे आम्ही वचन देत आहोत. आत्तापर्यंत प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आता प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पोहोचवले जाणार आहे. याचे काम वेगात सुरू आहे', असेही मोदी म्हणाले.

'संपूर्ण देश भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतिक्षा करत असून आमच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांपर्यंत देशातील जनतेला मोफत रेशन देण्यासह जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल. महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात येईल', असे आश्वासन यावेळी मोदी यांनी दिले.

'या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही आमच्या संकल्पपत्रावर काम सुरू करू. आम्ही सरकार म्हणून आधीच १०० दिवसांच्या कृती योजनेवर काम केले असून १४० कोटी देशवासियांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे माझे ध्येय आहे. वंदे भारतचे ३ मॉडेल देशात धावतील. वंदे भारत रेल्वेचा देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तार करताना वंदे भारत मेट्रो देखील सुरू करेल', असेही मोदी म्हणाले.

भाजपच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा

मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू राहणार

जनऔषधी केंद्रांचा विस्तार केला जाणार

५ लाख रुपयांचे मोफत उपचार सुरू राहतील.

७० वर्षांवरील प्रत्येक वृद्धाचा आयुष्मान योजनेंतर्गत समावेश केला जाणार

आणखी ३ कोटी पक्की घरे बांधण्यात येणार

ट्रान्सजेंडर समुहाला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणण्याचा निर्णय

PM Modi on BJP Manifesto : 'भाजपचे पहिले उद्दिष्ट तरूण, महिला, शेतकरी आणि गरीबांची उन्नती' : पंतप्रधान मोदी
PM Modi : पीएम मोदींनी लॉन्च केले ९० रुपयांचे नाणे

भाजपच्या जाहीरनाम्यातून मोदींच्या मोठ्या घोषणा

गेली १० वर्षे महिलांसाठी समर्पित होती. आता महिलांच्या सहभाग वाढवाणार

३ कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याची हमी

गरिबांचे ताट पोषणाने भरलेले असेल.

उज्ज्वला योजना यापुढेही सुरू राहणार आहे.

जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधे मिळत राहतील.

सूर्या घर मोफत वीज योजना सुरूच राहणार.

जगातील सर्वात जुनी भाषा असलेल्या तमिळ भाषेची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल.

आम्ही सामाजिक पायाभूत सुविधांवर भर देत आहोत.

अधिकाधिक सरकारी योजना ऑनलाइन केल्या जात आहेत.

७०० हून अधिक एकलव्य शाळा बांधल्या जाणार आहेत.

शेतकरी आणि आदिवासींसाठी घोषणा

पीएम किसान सन्मान निधी भविष्यातही सुरू राहणार

देशातील दुग्ध सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार

शेतकऱ्यांना कडधान्ये आणि तेलबियांमध्ये स्वावलंबी होण्यासाठी मदत केली जाईल

नैसर्गिक शेतीवर भर दिला जाणार

नॅनो युरियाचा जास्तीत जास्त वापरासाठी भर दिला जाईल

अन्न प्रक्रिया केंद्र बनवण्याचा संकल्प असेल

देशातील आदिवासी समाजाचे योगदान मोठे असून आदिवासी गौरव दिन साजरा केला जाणार. तसेच आदिवासींसाठी डिजिटल ट्राइब आर्ट अकादमीची स्थापना करण्यात येणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com