Nana Patole On Cotton import Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Import : कापूस आयातीचा मुद्दा तापला; नाना पटोलेंची केंद्रावर टीका, पत्रातून कापूस आयात रोखण्याची केली मागणी

Nana Patole On Cotton import : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारने बोळवणं केली आहे. पिकाला रास्त भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीत पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कापसाच्या आयातीवरून केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कापूस आयात थांबवून शेतकऱ्यांचे हित जपा, अशी मागणी केली आहे.

पटोले यांनी लिहलेल्या पत्रात, कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन झाले आहे. याकडे लक्ष न देता केंद्राने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली, २२ लाख गाठी कापसाची आयात केल्याचा दावा केला आहे.

आयातीच्या बातम्या आल्यानेच देशात कापसाच्या भावात मोठी घसरण झाली. तर भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. यामुळे केंद्राने राज्यासह देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी आणावी, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

तसेच भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सध्या कापसाचे भाव ६ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल असून हा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. सरकारने कापसाचा हमीभाव ७ हजार १२२ रूपये निश्चित केला आहे.

याबरोबरच पटोले यांनी, सध्या बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही. शेतकऱ्यांबरोबरच सीसीआयकडेही कापूस गाठी पडून आहेत. देशात एवढ्या मोठया प्रमाणात कापूस असताना कापसाची आयात करण्याची गरज काय? असा सवाल पटोले यांनी केला आहे. तर केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस बाजार कोलमडला असून याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. तर फायदा फक्त व्यापाऱ्यांना होत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी आधीच संकटात आला असून कमी भाव, शेती अवजारांवर १२ ते १८ टक्के जीएसटी आणि अवकाळी पाऊस या दुष्टचक्रात तो अडकला आहे. खराब हवामानामुळे यंदा १९ लाख हेक्टरील कापूस क्षेत्राचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्याप कागदावरच असून प्रधानमंत्री पीक विमा योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्याची ठरल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing : ‘छत्रपती’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Millet Rate : दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा

Natural Industries Group : नॅचरल शुगर सात लाख टन ऊस गाळप करणार

Global Warming : तापमान वाढ कसे कमी होणार; याचा अंदाज नाही

Narendra Modi : विकसित महाराष्ट्राचा शेतकरी सर्वांत मजबूत स्तंभ : मोदी

SCROLL FOR NEXT