Soybeans, Cotton and Onions : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त : काँग्रेसचा हल्लाबोल

Congress On Soybeans, Cotton and Onions : राज्यातील सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महायुतीसह केंद्रातील भाजप सरकारने उद्धवस्त केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Congress On Soybeans, Cotton and Onions
Congress On Soybeans, Cotton and OnionsAgrowon
Published on
Updated on

Pune News : महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन, कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. यामुळे राज्यातला शेतकरी उद्धवस्त झाला आहे. यामागे राज्यातील महायुती आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणे आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी (ता.२) मुंबईतील टिळक भवन येथून केला. तसेच चेन्नीथला यांनी शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे आणि भाजपची दिवाळी सुरू असल्याचा घणाघातही केला आहे. यावेळी वंचित आघाडीचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी चेन्नीथला यांनी, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि व्यापारी धार्जिण्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे. तो उद्धवस्त झाला असून यातूनच देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत.

Congress On Soybeans, Cotton and Onions
Soybean, Onion Market : सरकारने शेतकऱ्यांचा `करेक्ट कर्यक्रम` कसा केला? सरकारच्या कोणत्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली?

देशात सर्वात जास्त कापूस महाराष्ट्रात पिकतो पण सरकार ब्राझील आणि आफ्रिकेतून कापसाच्या गाठी आयात करत आहे. यामुळेच राज्यात कापसाचे भाव पडले आहेत आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे महागाई वाढली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे सीसीआय मार्फत सरकारने हमीभावाने कापूस खरेदी करावी, अशी मागणी चेन्नीथला यांनी केली.

राज्यात सोयाबीनची अवस्थाही काही वेगळी नसून सोयाबीन तयार झाले असून त्याला भाव नाही. सोयाबीनला हमीभावही मिळत नाही. यामुळे मिळेल त्या भावात सोयाबीन शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. शेतकरी सरकारकडे आर्त हाक मारत असून पिकाला भाव देण्याची मागणी करत आहेत.

मात्र केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पाम तेल आयात करत आहे. ज्याचा फटका सोयाबीनचे भाव पडले आहेत. तेलाचे दर देखील वाढले आहेत. आठवड्यापूर्वी १ हजार ६०० रुपयांना मिळणारा तेलाचा डबा आज २ हजार १५० रुपयांना झाला आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

Congress On Soybeans, Cotton and Onions
Soybean, Onion and Rice Update: निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका

तर कांदा पिकाच्या बाबतीत सरकारचे धोरण कायमच शेतकऱ्यांना मारक ठरले असून महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी लावून गुजरात आणि कर्नाटकचा कांदा निर्यात केला जात होता. गुजरातचा २ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला. कर्नाटकच्या कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटवले.

पण महाराष्ट्राच्या कांद्यावर निर्यात बंदी लादली. शेतकऱ्यांचा रोष वाढून लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर निर्यात बंदी उठवण्याचे नाटक केले आणि दुसरीकडे निर्यात शुल्क वाढवून मेख मारली. एवढ्यावरच केंद्रातील भाजप सरकार थांबले नाही तर परदेशातून कांदा आयात करून देशात कांद्याचे भाव पाडल्याचा आरोप चेन्नीथला यांनी केला आहे.

Congress On Soybeans, Cotton and Onions
Onion Soybean : कांदा, सोयाबीन, तांदूळ उत्पादकांना दिलासा

तर केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण हे महाराष्ट्र आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. राज्यातला शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध करायचा असेल तर राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवले पाहीजे, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

दरम्यान चेन्नीथला यांच्या हस्ते काँग्रेसच्या नव्या व्हिडीओ जाहिरातीचे अनावरण करण्यात आले. ज्तया केंद्र आणि राज्यातल्या शेतकरीविरोधी धोरणांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीक नुकसान भरपाई आणि हमीभावाच्या वचनांचा फोलपणाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com