Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करून बी-बियाणे व खते मोफत द्या : नाना पटोले

Drought condition in the state : राज्यातील जनता आणि शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना महायुती सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यावरून राज्याचे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील जनता आणि शेतकरी दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे काही गांभीर्य राहीलेले नाही. दुष्काळ आणि शेतीच्या समस्यांमुळे लोकसभा निवडणुकींच्या काळात राज्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या अजुनही सुरू असून डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिलेला नाही. तर राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची अवस्था आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.११) राज्यपाल यांची भेट घेऊन दुष्काळ व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

यावेळी शिष्टमंडळात प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. शोभा बच्छाव, खा. वसंतराव चव्हाण, खा. बळवंत वानखेडे, आ. मोहन हंबर्डे, आ.वजाहत मिर्झा, आ. धीरज लिंगाडे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ. विरेंद्र जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, राजेश शर्मा, रमेश शेट्टी, रमेश कीर, प्रमोद मोरे, सचिव झिशान अहमद, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुध्द ऊर्फ बब्लू देशमुख, अकोल्याचे प्रमोद डोंगरे, संदीप पांडे, आकाश जाधव, डॉ. गजानन देसाई, धनराज राठोड, मदन जाधव आदी उपस्थित होते.

राज्यपाल यांच्या भेटीनंतर पटोले म्हणाले की, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते. तर काही मंत्री परदेशात फिरण्यास गेले होते. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. अशा वेळी या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली होती? याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेला असताना, त्याला आधाराची गरज असताना. महायुती सरकार याचे गांभीर्य नाही.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. मात्र तसे काहीच झालेले नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरु आहे. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे, अशीही मागणी पटोले यांनी राज्यपाल यांच्याकडे केली.

महापुरुषांचा अपमान

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संसद परिसरात असलेल्या या दैवतांचे पुतळे भाजप सरकारने काढले. त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवताना आपल्या भावना राष्ट्रपतींना राज्यपाल महोदयांनी कळवाव्यात. अशी मागणी करताना महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशाराही पटोले यांनी यावेळी दिला.

भीमनगर प्रकरणी गुन्हे दाखल करा

यावेळी राज्यपाल यांच्याकडे पवईतील भीमनगर झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या नियमबाह्य कारवाईचा मुद्दाही मांडण्यात आला. हिरानंदानी या बिल्डरसाठी सरकारने गरिबांना बेघर केले. सरकार, प्रशासन व बिल्डराच्या संगनमताने ही कारवाई करण्यात आली. पावसाळ्यात अशी कारवाई करू नये असा नियम असताना, सर्वोच्च न्यायालयाचेही तसे निर्देश असताना ही कारवाई होतेच कशी असा सवाल पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

तर ही कारवाई करणाऱ्यांसह बिल्डरवर एससी, एसटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील करण्यात आल्याचे पटोले म्हणाले. तसेच उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही राज्यपाल महोदयांकडे करण्यात आल्याची पटोले म्हणाले

जरांगेंच्या उपोषणाची दखल

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण सुरु केलेले आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशीही विनंती नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांनी राज्यपालांकडे केली.

विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालामध्ये मोठ्या प्रमाणात अनिमियतता आणि गैरप्रकार झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. विद्यापीठाचे ईआरपी पोर्टल ४ महिन्यांपासून बंद असून विद्यार्थी या ग्रेड सिस्टममधील गुण ओळखू शकत नाहीत. १०० पेक्षा जास्त दिवस उलटूनही अंतिम वर्ष आणि पुरवणी परीक्षेचे निकाल पूर्णपणे जाहीर झालेला नाही. विद्यापीठाची पेपर तपासणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT