Congress Agrowon
ॲग्रो विशेष

Congress meets Governor : काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, विधीमंडळाच्या विशेष सत्राची मागणी

Maharashtra Politics : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली.

Swapnil Shinde

Political Crisis : राज्यातील आजारी शासकीय आरोग्यव्यवस्था, कंत्राटी नोकर भरती, दुष्काळ परिस्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.

नांदेड मृत्यूप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विधानसभातील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, नसीम खान , मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी अध्यक्षा वर्षा गायकवाड व काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळातील नाना पटोले आणि विजय वड्डेटीवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय; परिवहनची अतिरिक्त जमीन व्यापारी तत्वावर वापरास मंजुरी

Lumpy Skin : जाफराबादेत २१ जनावरांना ‘लम्पी’ची बाधा

Agriculture Solar Pump : पैसे भरूनही सौरपंप मिळेना

Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’तून गोदावरी पात्रात विसर्ग थांबविला

Krishi Seva Kendra : आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT