Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : 'मराठवाड्यातील शेतकऱ्यांबदद्ल मोदींना कोरडी चिंता' : नाना पटोले 

Nana Patole On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड आणि परभणी येथील प्रचार सभेत काँग्रेस, इंडिया आघाडी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पटोले यांनी सोयाबीन, कापसासह शेतमालाला मोदी सरकारच्या काळातच कवडीमोल दाम मिळत असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांबदद्ल मोदींना कोरडी चिंता दाखवत असल्याची टीका केली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड आणि परभणी येथील प्रचार सभेत शनिवारी (ता.२०) काँग्रेस, इंडिया आघाडी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यावेळी मोदी यांनी, काँग्रेसने देशाची फाळणी केली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न काँग्रेसने सोडवला नाही, अशी टीका केली होती. तर आता बाँम्बच्या नाही तर सर्जिकल स्ट्राईकच्या चर्चा रंगतात असे म्हटले होते. यावरून  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देताना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांबदद्ल मोदींना कोरडी चिंता दाखवत असल्याचे म्हटले आहे. 

पुढे पटोले म्हणाले, मोदी घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करतो अशी चर्चा सध्या देशात सुरू असल्याचे सांगत आहेत. असेच ते परभणीच्या प्रचार सभेत देखील बोलले. पण मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी केली. चीनने जमीन बळकावत आपल्या २० सैनिकांना मारले. तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत हे कसे दिसले नाही, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच मोदींनी पुन्हा एकदा देशाच्या विभाजनाचा मुद्दा मांडताना त्याचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी असे करून जनतेची दिशाभूल करत आहेत. देशाची फाळणी काँग्रेसने केली हा आरोप धांदात खोटा आहे. मोदी हे आरएसएसच्या खोटे बोलण्याच्या तालमीत तयार झाले आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा करणे देखील चुकीचे आहे. मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे आरोप करताना जरा अभ्यास करून बोलायला हवे असे देखील पटोले यांनी म्हटले आहे. 

तर मोदी ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्या भाजप, जनसंघ अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काय योगदान आहे? हे त्यांनी सांगावे. तर देशाची फाळणी ज्यांच्यामुळे झाली. त्या मुस्लीम लीगबरोबर हे सरकारमध्ये सहभागी होते, हे  मोदींना माहित असायला हवे, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल काँग्रेसने अनास्था दाखवल्याचे मोदी म्हणत आहेत. काँग्रेसने येथील शेतकऱ्यांची पिळवणूक केली असे म्हणत आहेत. हे आरोप बिनबूडाचे असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची चिंता कोरडी आहे. आज सभेत मोदींनी सोयाबीन, बाजारी, ज्वारी, कापसाच्या पिकाचे महत्व सांगितले. मात्र या पिकांना त्यांच्याच सरकारच्या काळात भावच मिळलेला नाही. कवडीमोल भावाने हे पीक शेतकऱ्यांना विकावे लागले आहे. 

मराठवाड्याचा शेतकरी संकटात असताना मदत देण्याऐवजी यांचे सरकार आणि भाजप दुसरे पक्ष फोडण्यात व्यस्त होता. आता निवडणुका आल्या की मोदींना शेतकऱ्यांची आठवण झाली काय? उज्वला गॅस, हर घर नल योजना, पंतप्रधान आवास योजना, मोफत राशन या योजनांचा पाढा मोदींनी वाचला परंतु ५ किलो मोफत धान्य देऊन गरिबांना महागाईच्या खाईत लोटले, उज्वला गॅसच्या नावाखाली गरिबांचे रॉकेल बंद केले. आज अनेकांना ११०० रुपयांचा गॅसही घेता येत नाही अशा योजनांचा उपयोग काय? मोदींच्या काळातच देशातील गरिब अधिक गरिब झाला. 

तर देशात सध्याच्या घडीला काँग्रेस मिळणारे जनसमर्थन आणि भाजपचा दिसणारा पराभव यामुळे मोदी यांच्याकडून भाषणात सातत्याने काँग्रेस नावाचा जप सुरू असल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत  

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित

Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले

SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित

Nanded Weather: नांदेडसाठी पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी

SCROLL FOR NEXT