Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : 'शेतकरी मजुराला काही समजत नाही, अशी भाजपची विचारसरणी'; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा आज समारोप होणार असून येथील शिवाजी पार्कवर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांची उपस्थित असणार आहे. राहुल गांधी यांची रविवारी (ता.१७) मुंबईतील मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा झाली. यावेळी बहीण प्रियांका गांधी वड्रा देखील सहभागी झाल्या होत्या.

यादरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करताना, 'ही भाजपसोबतची लढाई नसून दोन विचारसरणांमधील आहे. शेतकरी मजुराला काही ज्ञान नाही, शेतकऱ्यांना काही कळत नाही, अशी धारणा भाजपची आहे. मात्र देशातील वैज्ञानिकता जेवढे ज्ञान आहे, तेवढेच ज्ञान आपल्या देशातील शेतकऱ्यांना आहे', असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

गांधी यांचे संग्रहालय 'मणि भवन' येथे असून राहुल गांधी यांनी महात्मा गांधीजींच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. पुढे राहुल गांधी म्हणाले, 'भाजप हे संविधान संपवू पाहत आहे. पण हे होऊ शकणार नाही. भाजपमध्ये तेवढी धमक नाही. महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही जात असून देशात प्रेम, बंधुता, सद्भावना आणि न्याय प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे'.

'भारत हा प्रेमाचा देश असून येथे द्वेष पसरवला जातोय? असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. हे काम भाजप करत आहे. द्वेष पसरवणे इतके सोपे नाही. कारण याला आधाराची गरज असते. पण आता याला आधार मिळत असून देशातील गरीब, शेतकरी, दलित, महिला, तरुणांवर रोज अन्याय केला जातोय. देशातील जनतेवर अन्याय केला जातोय', असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच, देशातील मोजक्या उद्योगपती आणि अब्जाधीशांचे लाखो-कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला जात नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

न्याय मिळविणाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ती फक्त पाच टक्के आहे. यासाठी न्यायालय, सरकार आणि इतर सर्व संस्था काम करतात. मात्र देशातील ९५ टक्के लोकसंख्या आजही अन्याय सोसत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

पुढे राहुल गांधी म्हणाले, 'या यात्रेदरम्यान, मी एकटा चालत नव्हतो, तर लाखो लोक माझ्याबरोबर चालत होते. मी भारतीयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मी, इंडिया सरकार आलं तर काय करू? हे सांगताना गॅरंटी दिली. मी फक्त काँग्रेसची गॅरंटी दिली नाही. पण भाजप मोदींची गॅरंटी देत आहे'. 'भारतीयांच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी भाजप देत नाही. फक्त आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांच्याकडेच ज्ञान असे भाजपवाल्यांना वाटते. भाजप सत्तेत आली तर संविधान संपवतील. पण हे होणार नाही. कारण सत्य आणि भारतीय जनता आपल्यासोबत आहे', असे राहुल गांधी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT