Rahul Gandhi : शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्यांना ३५ हजार कोटी

Bharat Jodo Nyay Yatra : केंद्र सरकार १६ पीक विमा कंपन्यांना ३५ हजार कोटी रुपये देते हा जनतेचा पैसा आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी वाडा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान केली.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon

Mumbai News : ‘‘पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही तर कंपन्यांना होत आहे. केंद्र सरकार १६ पीक विमा कंपन्यांना ३५ हजार कोटी रुपये देते हा जनतेचा पैसा आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी वाडा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान केली.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यातील वाडा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. दरम्यान श्री. गांधी यांचा शुक्रवारचा (ता. १५) मुक्काम भिवंडी येथे नियोजित होता. उद्या (ता. १७) मुंबईतील शिवाजी पार्क येथे सायंकाळी पाच वाजता गांधी यांच्या यात्रेचा समारोप आणि जाहीर सभा होईल.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : '..आम्ही जल, जंगल आणि जमिनीचे हक्क आदिवासींना देऊ' : राहुल गांधी

भारत जोडो न्याय यात्रेची सुरवात सकाळी मोखाड्यातील हनुमान मंदिरापासून झाली. जव्हार येथील विजय स्तंभाला राहुल गांधी यांनी अभिवादन केले.

श्री. गांधी म्हणाले, ‘‘अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. सरकारी कंपन्यांमध्ये जनतेची भागीदारी होती. पण आता सरकारची कामेसुद्धा खासगी कंपन्यांकडूनच केली जातात. त्यामुळे ८८ टक्के समाज घटकांचे प्रतिनिधित्व दिसत नाही.

समाजाला मेहनत मजुरीची कामे करावी लागतात पण ज्या दिवशी हा समाज जागा होईल त्यादिवशी देश हादरेल. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण ते ओबीसी नाहीत, ते जनरल कोट्यातले होते, गुजरात सरकारने कायदा बदलला त्यानंतर ते ओबीसी झाले. पण महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केले.’’

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा आज नाशिकमध्ये शेतकरी मेळावा; शेतकऱ्यांशी संवाद साधणार!

‘‘ देशात ८८ टक्के लोकसंख्या ओबीसी, दलित, आदिवासी, मागास समाजाची आहे परंतु विविध क्षेत्रातील त्यांची भागीदारी अत्यंत कमी आहे. न्याय पालिकेतही वरच्या पदावर या समाज घटकातील लोकांची संख्या कमी आहे. ६ टक्के लोकांच्या हातात न्यायालय, मीडिया, पैसा, सत्ता आहे. जमीन अधिग्रहण करताना गरीब समाज घटकांची जमीन घेतली जाते पण अदानीची एक इंचही जमीन घेतली जात नाही,’’ असेही श्री. गांधी म्हणाले.

‘आदिवासींना जमीन पट्टे देऊ’

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास आदिवासींना जमीन पट्टे दिले जातील, असे आश्वासन श्री. गांधी यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘५० टक्के आदिवासी लोकसंख्या आहे तेथे ६ वे शेड्यूल लागू केले जाईल. त्यामुळे स्थानिक सरकार, गावाच्या हातातच सर्व अधिकार असतील. प्रशासन व विविध क्षेत्रातील ही विषमता दूर करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याची गरज आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणनाही केली जाईल. तुमच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवायला शिका, जागे व्हा.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com