Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe patil Agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Bharti Corruption : तलाठी भरती भ्रष्टाचारावरून बाळासाहेब थोरातांचा विखेंना इशारा

Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe patil : राज्यामध्ये झालेल्या तलाठी भरती गैरप्रकारावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात गाजलेल्या तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार प्रकरणावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे. विखे यांच्या एकतर तुम्ही संन्यास घ्या, नाही तर मी घेतो, या आवाहनाला थोरात यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तर विखेंना इशारा देताना, सत्य काही केलं तरी लपतं नाही', असा टोला थोरात यांनी लगावला आहे.

राज्यात झालेल्या तलाठी भरती भ्रष्टाचारावरून आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होते. यानंतर विखे यांनी नगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले होते. यावरून नगरमध्ये थोरात आणि विखे यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून थोरात यांनी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.

तर तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर एकतर मी राजकारणातून संन्यास घेतो. नसेल तर तुम्ही संन्यास घ्या, असे आवाहन थोरात यांना विखेंनी दिले होते. या आव्हानाला थोरात यांनी समाजमाध्यम एक्स वर पोस्ट करत प्रतिआव्हान दिले आहे. थोरात यांनी, आपल्याला राजकारण सोडण्याची गरज नाही. सत्य लपवले तरी बदलणार नाही, असे टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान नगर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना फेब्रुवारीतच तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल पाठविला होता. तर आमदार रोहित पवार यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आपल्याला पाठवला. तो पाहिला की नाही असा सवाल थोरात यांनी मंत्री विखेंना केला. तसेच पाहिला नसेल तर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल पाठवतो, असा टोला विखेंना लगावला आहे.

तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावरून मंत्री महोदयांनी कोणती कार्यवाही केली याचे उत्तर जनतेसह विद्यार्थ्यांना द्यावे. तर तलाठी भरतीमध्ये अजूनही ढीगभर गैरप्रकार झाले आहेत. ते उघड केल्यास तुमचा पारदर्शक कारभार' उघडा पडेल, असा इशारा थोरात यांनी विखेंना दिला आहे. आपल्या दोघांचा कार्याकाळ महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी पाहिला आहे. सत्य सगळ्यांनाच माहित आहे. पण आपले मात्र, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को...’ असं झाल्याची टीका थोरांनी विखेंवर केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT