Haryana Assembly Electorate 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Congress 7 Guarantee : काँग्रेसकडून हरियाणात हमीभाव कायदा, जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणासह ७ घोषणा, भाजपवर टीकाही

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला आता रंग चढत आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेसने नाराज शेतकऱ्यांकडे लक्ष घातले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहात असून सत्ता कायम राखण्याचे आव्हान सत्ताधारी भाजपसमोर आहे. तर काँग्रेस नाराज शेतकऱ्यांसह राज्यातील प्रमुख मुद्द्यांवरून रणनीती आखत आहे. बुधवारी (ता.१८) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सात मुद्द्यांची घोषणा केली. तसेच सात मुद्द्यांची हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात या घोषणा करण्यात आल्या. यात हमीभाव कायद्याचा मुद्दा देखील आहे. जो सध्या हरियाणात कळीचा मुद्दा ठरत आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा आणि हरियाणा निवडणुकीसाठी एआयसीसीचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गेहलोत, अजय माकन आणि प्रताप सिंग बाजवा यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी हमीभाव कायदा, जात सर्वेक्षण, महिलांना दरमहा २ हजार रुपये, तरुणांसाठी दोन लाख निश्चित भरती, गरिबांना १०० यार्ड भूखंड आणि प्रत्येकाला ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी खर्गे यांनी 'सात वचने, ठाम इरादे' असा नारा दिला आहे. तसेच लवकरच काँग्रेसचा सविस्तर जाहीरनामा चंदीगडमध्ये प्रसिद्ध केला जाईल असेही खरगे म्हणाले.

पुढे खरगे म्हणाले की, ही आमची 'सात आश्वासने, ठाम इरादे' आहेत. ही आश्वासने आम्ही सरकार येताच पूर्ण करू. आम्ही शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीच्या कायद्याबाबत (एमएसपी) हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ हरियाणात स्मारक बांधू आणि त्यांच्या मुलांना नोकरीही देऊ.

काँग्रेस पक्ष हरियाणातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. गेल्या १० वर्षांत मागे पडलेल्या राज्याला पुन्हा विकासाच्या ट्रॅकवर आणले जाईल आणि दिलेला प्रत्येक शब्द काँग्रेस पूर्ण करेल. राज्यातील आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी ही हमीभाव कायदा करण्याची आहे. त्यामुळेच आम्ही हमीभाव कायद्याचा मुद्दा वरच्या स्थानी घेतला आहे. याच मुद्द्यावर आमचा भर असेल, असे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यातील महिलांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, वृद्ध, अपंग आणि विधवांना मासिक ६ हजार रूपये पेन्शन देण्यासह जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली जाईल. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज आणि २५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील असेही काँग्रेस आश्वासन देत आहे. मागासवर्गीयांसाठी असणारी क्रिमी लेयर मर्यादा ६ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करणे, गरिबांसाठी ३ लाख ५० हजारात दोन खोल्यांचे घर देण्यासह हमीभावाखाली शेतकऱ्यांना तात्काळ पीक नुकसानभरपाई देण्याचा मानस असल्याचेही खर्गे म्हणाले.

यावेळी भाजपवर टीका करताना खर्गे म्हणाले, भाजपने गेल्या १० वर्षांत हरियाणाला ज्या प्रकारे बरबाद केले आहे. ती सुधारण्यासाठी काँग्रेस काम करेल. हरियाणात आज भ्रष्टाचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि अराजकता वेढलेली आहे. राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' आणि 'भारत जोडो न्याय यात्रे'त लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पण पंतप्रधान मोदींनी जनतेच्या मनातलं ऐकलं नाही. ते निवडक लोकांनाच भेटतात. जनतेतं जात नाहीत, असाही टोला खर्गे यांनी लगावला आहे.

हरियाणात 'या' दिवशी मतदान

हरियाणात ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी भाजप सत्ताराखून हॅट्रिक करण्याचा प्रयत्नात आहे. तर काँग्रेससह आपकडून भाजपच्या प्रयत्नांना सुरूंग लावण्यासाठी सर्व ताकद लावली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT