Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Co-Operative Sugar Factory : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करताच दुसऱ्याच दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईत अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करताच दुसऱ्याच दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईत अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

थकित कर्जप्रकरणी सुनावणी सुरू असताना राज्य सहकारी बॅंकेने केलेली कारवाई ही अनधिकृत आणि लहरीपणाची आहे, असे ताशेरे पुण्यातील कर्ज वसुली लवादाने या प्रकरणावर ओढत येत्या पाच मेपर्यंत विठ्ठल साखर कारखान्याची गोदामे ‘सील’मुक्त करण्यात यावीत, असे आदेश राज्य सहकारी बॅंकेला दिले आहेत.

राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) ४३० कोटी रुपयांच्या कर्जवसुली प्रकरणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तीन गोदामे सील केली होती. तसेच साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली हेाती. या कारवाईमुळे कारखान्याची जवळपास १ लाख साखर पोती अडकून पडली होती. बॅंकेने ही कारवाई २६ एप्रिल रोजी केली होती.

त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये भेट घेतली होती. त्या भेटीत तुम्ही लोकसभेला आम्हाला मदत करा; आम्ही तुम्हाला कारखान्यात मदत करतो, असा शब्द फडणवीस यांनी दिल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले होते.

दरम्यान, शिखर बॅंकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे पुण्यातील कर्जवसुली लवादात गेले होते. त्या ठिकाणी गुरुवारी (ता. २) सुनावणी झाली. त्या सुनावणीत शिखर बॅंकेच्या वतीने विठ्ठल कारखान्याचा अर्ज फेटाळण्यात यावा. कारखान्याकडे मोठी थकबाकी असून ती बॅंकेला परत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याच वेळी कारखान्याकडूनही आपली बाजू मांडण्यात आली.

विठ्ठल कारखान्याच्या थकबाकीचा वाद हा न्यायप्रविष्ठ आहे. बॅंकेच्या वतीले मागील तारखेच्या सुनावणीत कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही शिखर बॅंकेकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली. हे अनधिकृत आणि लहरीपणाचे आहे, असा शेरा नोंदवत येत्या पाच मेपर्यंत गोदामे सीलमुक्त करून ती कारखान्याकडे पुन्हा सोपविण्यात यावीत, असे निर्देश लवादाने दिले आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडीत अभिजित पाटील यांनी आपली राजकीय निष्ठा बदलत भाजपच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले पाटील यांनी भाजपचे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना समर्थन जाहीर केले आहे.

राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, त्यामुळे कर्ज वसुली लवादाने गोदामे सीलमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. गोदामे खुली झाल्याने उसाचे बिल शेतकऱ्यांना देण्याचा मार्ग खुला झाला आहे.
- अभिजित पाटील, अध्यक्ष, विठ्ठल साखर कारखाना, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT