Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चे ३४ जिल्ह्यात मेळावे; मेळाव्यातून योजनांची माहिती दिली जाणार

BTL Campaign Activate : राज्यसरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला मिळाला असून अनेक महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता या योजनेसह महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांचा प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागे गुरूवारी (ता.१२) शासन आदेश काढला आहे.

राज्यातील महायुती सरकारकडून सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवल्या जात आहेत. यामध्ये प्रसार आणि प्रचारासाठी जाहिरांतीसह भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री अजित पवार भर देताना दिसत आहेत. याआधी देखील राज्य सरकारने सरकार आपल्या दारी उपक्रमातून लोकांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे.

महिला व बाल विकास विभागे गुरूवारी जारी केलेल्या शासन आदेशात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवल्या जाणाऱ्या इतर योजनांची माहिती पोहचवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहेत. तर हे मेळावे बीटीएल कॅम्पेन अॅक्टीव्हीटी अंतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये भरवले जाणार आहेत.

तर ३४ जिल्ह्यात अशा मेळाव्यांची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने असणार आहे. जनसंपर्क महासंचालनालयाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत याच महिन्याच्या अखेरपर्यंत आयोजित करायचे आहेत.

योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद

दरम्यान याआधी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची अंतिम मुदत वाढवण्यात आली. आता योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत असणार असून महिन्याला १५०० रूपये दिले जाणार आहे. याआधी जून आणि जुलै महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना देण्यात आले असून सरकारने आतापर्यंत १.७ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग केला आहे. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसेही काहीच दिवसात दिले जाणार आहेत. या योजनेसाठी सरकारने ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT