Mumbai APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai APMC Lilav: मुंबई बाजार समितीमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव करा

Open Auction Demand: मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाचे खुले लिलाव होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, बारामतीच्या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले.

गणेश कोरे

Pune News: विविध कारणांनी चर्चेत असलेल्या मुंबई (वाशी) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव होत नसल्याची लेखी तक्रार निवेदनाद्वारे बारातमीमधील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट केली. या बाबत पवार यांनी बारामतीमधील व्यासपीठावरून, या निवेदनाची दखल घेत, पणनमंत्री जयकुमार रावल यांना या विषयाबाबत सांगतो, असे आश्‍वासन दिले.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव होत नसल्याचे वास्तव आहे. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक झाल्यावर आडतदार आणि खरेदीदार यांच्यात संगनमताने शेतीमालाचे दर ठरविले जातात. याची कल्पना देखील शेतकऱ्यांना दिली जात नाही हे वास्तव आहे.

अनेक बाजार समित्यांमध्ये निवडक शेतीमालाचे लिलाव रूमालाखाली होत आहेत. या व्यवहारामध्ये शेतकरी स्वतः लिलावाच्या वेळी उभा असला तरी त्याला आपल्या शेतीमालाला किती दर मिळाला हे समजत नाही. या व्यवहारात आडतदार हिशेबपट्टी देईल तेव्हाच शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाला किती दर मिळाला हे समजते.

यावर शेतकरी संघटनांनी आवाज उठविला तरी अद्याप अनेक बाजार समित्यांमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव होत नसल्याचे वास्तव बारामती येथील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार रविवारी (ता. १३) बारामतीमध्ये आले असताना शेतकऱ्यांनी मुंबई बाजार समितीमधील शेतीमालाच्या खुल्या लिलावांबाबत निवेदन दिले. हे निवेदन वाचून पवार यांनी व्यासपीठावरूनच हा विषय पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT