MLA Subhash Deshmukh agrowon
ॲग्रो विशेष

MLA Subhash Deshmukh : पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी जनजागृती मोहीम राबवा

Team Agrowon

Kharif Season Update Solapur News : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाडीबीटी योजनेमार्फत कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्यावा, तसेच खरीपासह रब्बी हंगामातील पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवा, अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केल्या.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील खरीप हंगाम २०२२-२३ साठी खरीप पूर्व आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये आमदार देशमुख यांनी ही सूचना केली.

या आढावा बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी वाघ, डॉ. व्ही.टी.जाधव, आहारतज्ज्ञ डॉ. ज्योती पाटील, कृषी अधिकारी श्रीमती शिल्पा कसबे, मळसिद्ध मुगळे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, की तालुक्यात युरियासह सर्व खतांची पुरेशी उपलब्धता ठेवा, शेतकऱ्यांच्या तक्रारी येता कामा नये, त्याशिवाय तालुक्यात जमिनी सुधारणा, प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन केंद्र वाढीसाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत, त्यासाठी आवश्यक ते साह्य देऊ, असेही ते म्हणाले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी माळी यांनी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, लागवड तंत्रज्ञान, विशेष मोहीम याबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

डॉ. ज्योती पाटील यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व आहार व्यवस्थापन, डॅा. तांबडे, डॉ.जाधव यांनी खरीप हंगामातील कडधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहायक अशोक राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT