Nilam Gorhe Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari : आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर कामे पाच जुलैपर्यंत पूर्ण करा

Team Agrowon

Solapur News : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार असून, पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात व परिसरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची दक्षता घेऊन संबधित विभागांनी सर्व कामे ५ जुलैपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्या.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर श्री रुक्मिणी मंदिर देवस्थान व जिल्हा प्रशासनासमवेत ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या. या ऑनलाइन बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलिस, अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की प्रत्येक शासकीय विभागांनी परस्परात समन्वय ठेवून आषाढी वारीनिमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. वारकरी भाविकांना पालखी मार्गावर, रिगंण सोहळा व प्रदक्षिणा मार्गावर खडी टोचणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गाची कामे वेळेत करावीत.

भाविकांच्या सुरक्षेसाठी महावितरण व नगरपालिका प्रशासनाने विद्युत साक्षरता व जनजागृती मोहीम राबवावी. पालखी मार्गावर महिला कक्ष, चेंजिंग रूम, सॅनिटरी नॅपकीन आदी व्यवस्थेची उपलब्धता ठेवावी. नदीपात्रात धोकादायक ठिकाणी माहिती फलक लावावेत. वारकऱ्यांच्या सुखमय प्रवासासाठी एसटी बसेस तपासणी करून सुस्थितीत असण्याची खात्री करावी, असे त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT