Crop Damage Flood agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीने झालेल्या शेतीनुकसानीची भरपाई रखडली

Heavy Rain Agriculture Damage : पूरस्थिती निर्माण होऊन भातपीक, नाचणी, भुईमूग, मका, मोठे नुकसान झाले. याशिवाय आंबा, काजू, नारळ, कोकम, फणस, केळी, सुपारी, अननस यांसह विविध फळपिकाचे नुकसान झाले.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत ८८० हेक्टर शेती आणि बागायतीचे १ कोटी ३७ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्यामुळे ही भरपाई नेमकी कधी मिळणार, असा प्रश्न जिल्ह्यातील ७ हजार १२० शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिलह्यात या वर्षी मे अखेरीला वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या कालावधीत आंबा, काजूसह विविध फळपिकांचे नुकसान झाले. त्यानंतर जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली. ६ जुलैपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन भातपीक, नाचणी, भुईमूग, मका, मोठे नुकसान झाले.

याशिवाय आंबा, काजू, नारळ, कोकम, फणस, केळी, सुपारी, अननस यांसह विविध फळपिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील भात आणि इतर जिरायत पिकांचे सुमारे ६६७.३३ हेक्टर, तर फळपिकांचे सुमारे २११.५८ हेक्टरचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ७ हजार १२० शेतकऱ्यांचे सुमारे १ कोटी ३७ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले.

काही नुकसानीचे कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त पंचनामे केले. परंतु काही क्षेत्रावरील नुकसानीचे अजूनही संयुक्त पंचनामे केलेले नाहीत. मे अखेरीला नुकसान झाल्यानंतर आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील अजूनही त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

याशिवाय जून, जुलैमधील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ही भरपाई मिळणार तरी कधी असा प्रश्न जिल्ह्यातील ७ हजार १२० शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे अजूनही कृषी विभागाकडे प्राप्त झालेले नाही.हे पंचनामे २ सप्टेंबरला प्राप्त होणार आहेत.
- अरुण नातू, जिल्हा तांत्रिक अधिकारी, कृषी विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT