Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season Judgement : ऊसगाळप हंगामासंदर्भात बुधवारी मंत्री समितीची बैठक

Sugarcane Crushing Season : राज्यातील ऊसगाळप हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी (ता. १८) मुंबईत मंत्री समितीची बैठक होणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : राज्यातील ऊसगाळप हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी (ता. १८) मुंबईत मंत्री समितीची बैठक होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक संपल्‍यानंतर त्याच ठिकाणी ही बैठक होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेणार आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यात यंदा १४ लाख ७ हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून १ हजार २२ लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

त्यातील ९० टक्के ऊस गाळपास आल्यास एकूण ९२१ लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. त्यातून सव्वाअकरा टक्के साखर उतारा अपेक्षित धरल्यास १०३.५८ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे.

इथेनॉलकरिता १५ लाख टन साखर वळविल्यास व संभाव्य निव्वळ साखर उतारा दहा टक्के गृहीत धरल्यास राज्यात यंदा ८८.५८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८७ हजार हेक्टर ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाचा हंगाम कधी सुरू करायचा याबाबत कोणता निर्णय होतो याकडे ऊस उत्पादकांबरोबर साखर उद्योगाचेही लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT