Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : अखेर मुहूर्त सापडला ! गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मंगळवारी मंत्री समितीची बैठक

Sugarcane Harvesting : यंदाच्या ऊस गाळप हंगाम सुरु करण्याबाबत दि. १७ ऑक्टोबरला मंत्री समितीची बैठक होणार आहे.

Swapnil Shinde

Sugarcane Crushing Season : दसरा जसजसा जवळ येतोय, तसतशी ग्रामीण भागात साखर कारखाना सुरू होण्याची लगबग सुरु होते. परंतु मंत्रिमंडळाची बैठक न झाल्याने कारखाने द्विधा मनस्थितीत आहेत. अशा परिस्थितीत २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगाम सुरु करण्याबाबत येत्या मंगळवारी (दि.17) मंत्रालयात मंत्रिमंडळ समितीची बैठक होत आहे. मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने ऊस क्षेत्रात घट झाली. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊस उत्पादनाला फटका बसणार आहे. साखर आयुक्तालय आणि कारखान्यांनी गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याची तयारी केली आहे. त्यावर या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, संबंधित विभागाचे सचिव, राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह साखर उद्योगातील अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यात यंदा १४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक उभे आहे. गाळपासाठी एकूण १ हजार २२ लाख टन उसाचे गाळप अपेक्षित धरण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा ११.२५ टक्के गृहित धरुन एकूण साखर उत्पादन १०३ लाख ५८ हजार टन होण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे.

गळीत हंगाम सुरू करण्याची सुरू करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना शासनाकडून ५९ टक्के दरवाढ मिळावी, या मागणीसाठी विविध ऊसतोड मजुर संघटनांनी १ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक तोडगा काढण्याचे आव्हान साखर कारखाने आणि राज्य शासनासमोर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT