Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यात व्यापारी बॅंका मागेच

Team Agrowon

Chhatrapati sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत उद्दिष्टाच्या तुलनेत मेच्या पहिल्या आठवड्याअखेर केवळ १७.८० टक्के कर्जपुरवठा झाला आहे. त्यातही व्यापारी बँकांना केवळ ८.६४ टक्के कर्जपुरवठा केला असून, जिल्हा मध्यवर्ती बँकांनी मात्र कर्जपुरवठ्यात ४३.१९ टक्के उद्दिष्ट गाठून आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मॉन्सूनची गती वाढल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीची सोय लावण्यासाठीची लगबग वाढली आहे. शेती तयार करण्याची कामे काही ठिकाणी अंतिम टप्प्यात तर काही ठिकाणी आटोपून पूर्वहंगामी कपाशी आले, मिरची व इतर पिकांची लागवड सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांकरिता सहकारी व्यापारी व ग्रामीण बँका मिळून ५२२५ कोटी २ लाख रुपयांचे कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उद्दिष्टाचा तुलनेत विविध बँकांनी ३ जून अखेरपर्यंत ९३० कोटी ३ लाख ६ हजार रुपयांचा कर्जपुरवठा जवळपास १ लाख २१ हजार ३७८ शेतकऱ्यांना केला. म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७.८० टक्केच कर्जपुरवठा करण्यात बँकांना यश आले आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा वाटा ४१.१९ टक्के, व्यापारी बँकांचा वाटा केवळ ८.६४ टक्के तर ग्रामीण बँकेचा वाटा २८.५९ टक्के इतका आहे.

चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ९२३ कोटी ९९ लाख रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत चारही जिल्हा बँकांनी ८४ हजार ५०७ शेतकऱ्यांना ३८६ कोटी १६ लाख ७२ हजार रुपये कर्जपुरवठा केला आहे. व्यापारी बँकांना ३४३८ कोटी २९ लाख रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

त्या तुलनेत या बँकांनी १२७५९ शेतकऱ्यांनाच २९७ कोटी १८ लाख ८ हजार रुपये कर्जपुरवठा करत केवळ ८.६४ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ग्रामीण बँकला ८६२ कोटी ७४ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्या तुलनेत ग्रामीण बँकेने २४१२ शेतकऱ्यांना २४६ कोटी ६७ लाख ५४ हजार रुपये कर्जपुरवठा करत २८.५९ टक्केच उद्दिष्टपूर्ती केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ३७.४१ टक्के कर्जपुरवठा झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पेरणीपूर्वी आवश्यक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना मिळणे कितपत यशस्वी होईल हे सांगणे जरा कठीणच आहे.

जिल्हानिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा

छत्रपती संभाजीनगर

उद्दिष्ट १५५४ कोटी २८ लाख

कर्जपुरवठा ५८१ कोटी ४० लाख १५ हजार

शेतकरी ६८ हजार ६८५

टक्केवारी ३७.४१

जालना जिल्हा

उद्दिष्ट १३०८ कोटी

कर्जपुरवठा २४७ कोटी ६३ लाख ८२ हजार

शेतकरी ४०२१९

टक्केवारी १८.९३

परभणी जिल्हा

उद्दिष्ट १४७० कोटी ९७ लाख

कर्जपुरवठा १६ कोटी ४६ लाख ४७ हजार

शेतकरी ३५७६

टक्केवारी १.१२

हिंगोली जिल्हा

उद्दिष्ट ८९१ कोटी ७७ लाख

कर्जपुरवठा ८४ कोटी ५२ लाख ६२ हजार

शेतकरी ८८९८

टक्केवारी ९.४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT