Kharif Crop Loan : खरिपासाठी जिल्हा बँकेकडून २५३ कोटींचे कर्जवाटप

Crop Loan distribution : १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरुवात झाली असून, आतापर्यंत २५३.२१ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी ५९६.३६ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरुवात झाली असून, आतापर्यंत २५३.२१ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४० टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक कर्ज निफाड तालुक्यात तर सर्वांत कमी कर्ज त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाटप झाले आहे.

आगामी कृषी वर्षासाठी जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ६२८.०६ कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. गतवर्षी हा लक्ष्यांक ६१५ कोटींचा होता. यंदा त्यात काहीशी वाढ झाली आहे. यात खरिपासाठी ५९६.३६ कोटींचे उद्दिष्ट आहे. तर रब्बी हंगामासाठी ३१.७० कोटींचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०२४ पासून कर्जवाटप सुरू झाले असून, आतापर्यंत एकूण २३ हजार २४ हेक्टर क्षेत्रासाठी २६ हजार ३३३ शेतकऱ्यांना १५ मेअखेर २५३.२१ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. खरिपासाठी सरासरी ४२ टक्के कर्जवाटप झाले आहे.

Crop Loan
Crop Loan Distribution : अकोल्यात खरिपासाठी पीककर्ज वाटप संथगतीने

कर्ज मागणी वाढणार

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे गंभीर संकट आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यातच मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. यंदा समाधानकारक मॉन्सून असणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पीककर्ज मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीककर्ज घेता येणार आहे.

Crop Loan
Crop Loan : अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांचे शेतकरी पीककर्जापासून वंचित

खरीप पीककर्ज दृष्टिक्षेपात

पीककर्जाचे एकूण उद्दिष्ट ५९६.३६ कोटी

आतापर्यंत झालेले वाटप २५३ कोटी २२ लाख

लाभ घेतलेले एकूण शेतकरी २६ हजार ३३३

पीककर्जाचा लाभ झालेले क्षेत्र २३ हजार हेक्टर

तालुकानिहाय मेअखेरपर्यंतचे पीक कर्जवाटप

निफाड ७९.२५ कोटी

येवला ३५.८४ कोटी

मालेगाव २३.३२ लाख

देवळा १०.१६ लाख

इगतपुरी २३.९९ लाख

कळवण ८.५५ लाख

दिंडोरी २३.९९ लाख

नांदगाव १०.०५ लाख

नाशिक २०.०८ लाख

पेठ २२ लाख

सटाणा १६.१४ लाख

चांदवड १५.५० लाख

सिन्नर ८.८९ लाख

त्र्यंबकेश्वर ०१.८५ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com