Agriculture Implements Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Implements : ‘तारांकित’मुळे ‘पोकरा’तील यंत्रांच्या माहितीची जुळवाजुळव

POCRA Subsidy : अकोला जिल्ह्यात प्रकल्पातून सुमारे तीन कोटी ६३ लाख रुपये किमतीची अवजारे तपासणीदरम्यान आढळून आलेली नव्हती.

 गोपाल हागे

Akola News : जिल्ह्यात नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी (पोकरा) प्रकल्पातून शेतकरी गट, कंपन्यांना वितरित केलेले साहित्य, अवजारे गायब झाल्याप्रकरणाची विधीमंडळातील सदस्यांनी दखल घेतली.

याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर प्रकल्पाच्या जिल्ह्यांत वितरित झालेल्या साहित्य व अवजारांबाबत माहितीची जुळवाजुळव केली जात आहे.

प्राथमिक स्वरूपाची माहिती तातडीने सादर करण्यात आली आहे. तर अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा या यंत्र, अवजारांच्या मोका तपासणीसाठी कार्यवाही केली जाणार आहे.

अकोला जिल्ह्यात प्रकल्पातून सुमारे तीन कोटी ६३ लाख रुपये किमतीची अवजारे तपासणीदरम्यान आढळून आलेली नव्हती. तपासणीवेळी काहींनी आपली अवजारे बाहेर गेल्याचे कारण दिले होते. याबाबत तपासणीसाठी आलेल्या पथकांचा संयुक्त अहवाल विभागीय सहसंचालकांना सादर झाला.

त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी पोकरा प्रकल्प संचालकांकडे हे प्रकरण सादर केले. प्रकल्प संचालकांनी दिलेल्या निर्देशानंतर अकोला जिल्ह्यात ११८ गटांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. यापैकी सुमारे ८० पेक्षा अधिक जणांनी कारणे दाखवा नोटिसांना उत्तर सादर केले आहे.

यापैकी बहुतांश जणांनी तपासणी अहवालात यंत्र, अवजारे आढळून न आल्याचा आक्षेप खोडून काढला आहे. तपासणीवेळी यंत्र, अवजारे बाहेर गेलेली होती. तपासणीवेळी पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती. परिणामी समितीतील सदस्यांना अवजारे दाखविता आली नाहीत, अशी एकसुरी उत्तरे बहुतांश गटांनी सादर केल्याचे समजते. या प्रकरणात कार्यवाही दिवसेंदिवस लांबतच चालली आहे.

चौकशांवर चौकशा

या प्रकरणात सुरवातीला वाशीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या चौकशी समितीने तपासणी केली. त्यानंतर त्यांच्या अहवालावरून बुलडाणा जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीकडून तपासणी झाली. आता तारांकित प्रश्नामुळे तातडीने माहिती देण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकांमार्फत यंत्र, अवजारांची सत्यस्थिती जाणून घेतली जाईल.

या बाबत तपासणीचे पत्र जारी झालेले आहे. योजनेच्या अनुदान वितरणात काहींनी मलिदाही लाटला. वरिष्ठस्तर अधिकाऱ्यांनी दोनदा चौकशीही केली. तरीही आता प्रकरणात यंत्र, अवजारे तपासण्याचे काम आमच्याकडून करून घेतले जात असल्याचे काहीजण खासगीत बोलत आहे. आता मोका तपासणीतून खरोखर अवजारे गायब आहेत की नाही, हे समोर येऊ शकेल.

‘तारांकित’मुळे सर्वत्र शोधाशोध

अकोला प्रकरणाची दखल घेत बाळासाहेब थोरात, नाना पटोले, राजेश एकडे, संजय जगताप, शिरीष चौधरी, प्रतिभा धानोरकर आदी आमदारांनी हा विषय हातात घेतला आहे. या बाबत दाखल तारांकित प्रश्नाची माहिती प्रकल्पाच्या जिल्ह्यातून मागविण्यात आली. यामुळे यंत्रणांकडून यंत्रे, अवजारांची मिशन मोडवर माहितीची जुळवाजुळव करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT