Co operative Societies Elections agrowon
ॲग्रो विशेष

Co operative Societies Elections : ग्रामीण भागाचा कणा असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगिती

Maharashtra Society :राज्य शासनाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना येत्या ३१ मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Co operative Election : राज्य शासनाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना येत्या ३१ मेपर्यंत स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात ३८ हजार ७४० सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यापैकी राज्यात १० हजार ७८३ निवडणुकांची प्रक्रिया सुरू असतानाच हा निर्णय झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार पणन विभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे.

राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ९३ हजार ३४२ सहकारी संस्थांपैकी ५० हजार २३८ सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. मागील २०२३ वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत ९३ हजार ४४२ निवडणुकांसाठी पात्र होत्या. त्यापैकी ५० हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या.

उर्वरित सहकारी संस्थांपैकी १० हजार ७८३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. तर २० हजार १३० सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र प्रलंबित आहेत. तसेच यंदाच्या २०२४ या वर्षात ७,८२७ सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सगळ्या मिळून ३८ हजारांहून अधिक सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे.

सहकार विभागाकडून निवडणुकांची तयारी सुरू असतानाच देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सहकार विभागाने उच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिलेल्या निवडणुका वगळून येत्या ३१ मे २०२४ पर्यंत सरसकट सगळ्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे.

राज्यात ९३,३४२ निवडणूक संस्था पात्र आहेत यातील १०,७८३ सहकारी संस्थांची प्रक्रिया सुरू आहेत तर २०,१३० संस्थांची कामे प्रलंबित आहेत तर ७,८२७ २०२४ मध्ये पात्र आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT