Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का प्रकरण; सत्ताधारी, विरोधक आमनेसामने

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि शिक्का असलेली काही निवेदने समोर आली.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsagrowon
Published on
Updated on

Vijay Wadettiwar and Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली. त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली. परंतु विधानसभेत सुरू असलेल्या अधिवेशनावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच मुख्यंत्र्यांच्या बनावट सही शिक्का प्रकरणी जोरदार आवाज उठवला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली.

यावर अजित पवार म्हणाले की, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्यसरकारने त्याची दखल घेतली आहे.

या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

यावर वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी सुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी सहा महिने तोतया म्हणून कार्यरत होता. जर राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच तसेच मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात राजरोसपणे तोतया विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून वावरत होता. इतकेच नव्हे तर त्या तोतयाने आठ महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शासकीय दस्ताऐवज यांमध्ये हस्तक्षेप तो करत होता. स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि स्वाक्षरी घेऊन यायचा. तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे देखील मुख्यमंत्र्याना माहीत नव्हते ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. हा सर्व गोंधळ बघता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे.

सर्व जनतेला दिसत आहे. हे सर्व नेमकं चाललंय काय, याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री,उपपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा अशी टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com