Devendra Fadanvis  Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadanvis : ‘जीआर’ वर ‘जीआर’ बंद करणार ः मुख्यमंत्री फडणवीस

GR System : सरकार ‘जीआर’ (शासन निर्णय) वर जीआर काढत जाते. मात्र कालांतराने कोणता प्रमाण जीआर आहे तेच कळत नाही.

Team Agrowon

Pune News : सरकार ‘जीआर’ (शासन निर्णय) वर जीआर काढत जाते. मात्र कालांतराने कोणता प्रमाण जीआर आहे तेच कळत नाही. त्यामुळे अनेक कामांमध्ये खोळंबा होतो. हे सर्व टाळण्यासाठी आता सर्व जीआर एआयद्वारे आणून प्रमाण एकच प्रमाण जीआर काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेत ते बोलत होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जुन्या शासन निर्णयांचा आधार घेत नागरिक, अधिकारी, कर्मचारी कसे प्रशासनात अडचणी निर्माण करतात याचा पाढा शिक्षण आणि आरोग्य सचिवांसमोर वाचला. या वेळी गोरे म्हणाले, ‘‘राज्यात विविध विभागांचे शासन निर्णय (जीआर) खूप झालेत.

ज्याला जो लागू होतो तो जीआर घेऊन येतो. मात्र तो जीआर कालबाह्य झालेला असतो. त्यावर दुसरा जीआर आलेला असतो. यामुळे कोणताही निर्णय घेण्यास क्लिष्टता येते आणि विलंब होतो. यामुळे सर्व जुने जीआर संपले पाहिजेत. सचिवांना कोण भेटायला येत नाही. आम्हाला २-२ हजार लोकांना तोंड द्याव लागते.

यावर शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रसाद सिंह यांनी यावर समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले. यावर मंत्री गोरे म्हणाले, ‘‘समित्यांनी आम्ही थकून गेलोय. समित्यांचा अहवाल कधीच येत नाही. त्यामुळे समित्या नकोत. जुने जीआर रद्द करण्याची मागणी केली.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास विभागातील प्रशासकीय सुधारणांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहा समित्यांपैकी एका समितीला सर्व विविध जीआर एकत्रित करून, ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून कालबाह्य जीआर रद्द करून, संबंधित विषयाचा एकच प्रमाण जीआर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT