CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आज कोल्हापुरात, लाडक्या बहिणींसाठी ७७२ विशेष बसची सोय

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सन्मान अभियानांतर्गत आज (ता. २२) येथे माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा होणार आहे.

sandeep Shirguppe

Ladaki Bahin Yojana Kolhapur : मुख्यमंत्री महिला सन्मान अभियानांतर्गत आज (ता. २२) येथे माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा होणार आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तसेच महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे येणार आहेत. तपोवन मैदानावर सकाळी दहापासून या सोहळ्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान जिल्ह्यातून महिलांना येण्याजाण्यासाठी अनेक मार्गावरील बस वाहतूक थांबवून लाडक्या बहिणींसाठी विशेष बसचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात विविध योजनांमधील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तसेच महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींनी आज तपोवन मैदानाची पाहणी केली.

महिला भगिनींची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी केल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, शिवसेना निरीक्षक शरद कणसे, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, रणजित जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे आदिल फरास, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, आयुक्त के. मंजूलक्ष्मी उपस्थित होते.

नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे दुपारी १२ वाजता विमानतळावर येतील. तेथून ते १२.३० वाजता तपोवन मैदानावर येतील. महिला सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोहळा संपवून ते दुपारी २.३० वाजता विमानतळावर जातील. तेथून विमानाने मुंबईकडे जातील.

५० हजार महिला येणार

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून महिलांना सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या ७७२ बसगाड्यांचे नियोजन केले आहे. सुमारे ५० हजार महिला सोहळ्याला येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT