CM Eknath Shinde agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : कोयना धरणाच्या जलाशयाबाबत मुख्यमंत्र्यांनी कायदाच बदलला, शिवसागर तलाव होणार पर्यटन क्षेत्र

Koyana Dam : कोयना धरणाचा बॅकवॉटर असलेल्या शिवसागर तलावात आता बोटींग करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Koyna Dam Backwater : कोयना धरणाचा बॅकवॉटर असलेल्या शिवसागर तलावात आता बोटींग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे. कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.

ही सुधारणा करण्यात आल्याने धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निर्णयानुसार धरण क्षेत्राच्या सुरक्षितेतला प्राधान्य देत धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवण्यात आले आहे. तसेच ७ किमी नंतरच्या २ किमीच्या क्षेत्राला बफर झोन म्हणून घोषित केले आहे.

त्यापलीकडील जलाशयाचा विस्तीर्ण परिसर जल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा येथील शिवसागर अर्थात कोयना धरण येथील जंगले, सह्याद्री डोंगराच्या रांगा, निळेशार पाणी असे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पांचगणी, वाई, कास पठार येथे येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळविता येईल.

दरम्यान, या माध्यमातून सातारा जिल्ह्यासाठी पर्यटकांची नवीन बाजारपेठ निर्माण होऊ शकणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. या भागाचा शाश्वत आणि पर्यावरण आधारित विकासाला वेग देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT