Sugarcane Farmer Kolhapur : कोल्हापूरचा शेतकरी ग्रेटच! तब्बल वीस अंतरपिके घेत ऊसशेतीही केली फायदेशीर

sandeep Shirguppe

महादेव ताकमारे प्रगतशील शेतकरी

कोल्हापूर जिल्‍ह्यात प्रसिद्ध कणेरी मठापासून काही किलोमीटरवर कात्यायनी परिसरात कोगील बुद्रुक गावात महादेव मारुती ताकमारे हे प्रगतशील शेतकरी राहतात.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

पाच एकर शेतीत अनेक प्रयोग

कृषी पदविकाधारक असलेले महादेव ताकमारे हे शाहू सहकारी साखर कारखान्यात कृषी सहायक आहेत. त्यांची पाच एकर शेती असून, तीन एकर लागवडीखाली असते.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

आपल्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा

नोकरी सांभाळून ते घरची शेतीही उत्कृष्टपणे सांभाळतात. त्यांचे प्रत्येकी २० गुंठ्यांचे ऊस प्लॉट आहेत. त्यातील एका प्लॉटमध्ये उसात आंतरपिके घेत शेतीत त्यांनी वौविध्यता आणत त्यांनी शेतकऱ्यांना नवा आदर्श दिला आहे.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

आंतरपिकांना प्राधान्य

फक्त ऊस या पिकावर ते अवलंबून न राहता त्यांनी आंतरपिकांना प्राधान्य दिले आहे. आज हीच तंत्रपद्धती त्यांचे उसाचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

उसातील आंतरपिकांचे व्यवस्थापन

आडसाली, पूर्वहंगामी व सुरू अशा विविध हंगामांत उसाची लागवड. त्या त्या हंगामातील लागवडीत ते विविध प्रकारची आंतरपिके घेतात.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

अनेक आंतरपिके घेतात

ऊस लागवडीसोबत भुईमूग, मिरची, दोडका, भेंडी, मका, चवळी, उडीद, वांगी, टोमॅटो, गवार, कोबी, बीटरूट, कोथिंबीर, शेपू, झेंडू, काकडी, दोडका, भोपळा आदी पिके घेतात.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

भरणी झाली तरी भाजीपाला

अनेक शेतकरी उसाची भरणी होईपर्यंत आंतरपिकांचा पर्याय निवडतात. पण ताकमारे यांनी भाजीपाला सरी व बोदाच्या खाली घेतात. त्यामुळे उसाची भरणी झाली तरी भाजीपाल्याचे रोप भरणीत मुजले जात नाही.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

काढणी व विक्रीचे नियोजन

भाजीपाला काढणी आठवड्यातून दोन ते तीनदा होते. काढणीसाठी कोणत्याही मजुरांची मदत घेतली जात नाही. तर पत्नी अलका व आई श्रीमंती यांची मोठी मदत त्यामध्ये होते.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

फक्त ऊस शेतीचा फटका

सध्या उसाचा उत्पादन खर्च बेसुमार वाढला आहे. इतका खर्च करूनही पाण्याअभावी उसाची वाढ चांगली न झाल्यास ऊस शेती तोट्यात येते. याचा फटका महादेव यांना बऱ्याचदा बसला.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

आंतरपिकांमुळे अनेक फायदे

यामुळे ताकमारे यांनी आंतरपिके घेण्याचा निर्णय घेतला, आंतरपिकांची विविधता असल्याने एखाद्या भाजीला कमी दर असल्यास दुसऱ्या भाजीतून तो भरून निघत असल्याचे त्यांनी सांगितलं.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

दूध उत्पादनासह ऊस उत्पादन

महादेव यांची पाच जनावरे आहेत. दूध उत्पादनासह ऊस उत्पादनातही त्यांनी विविध पुरस्‍कार मिळवले आहेत. मुलगा प्रतीक बीएस्सी ॲग्रीचा, तर मुलगी प्रणाली सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याचे ते म्हणाले.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

dhananjay munde | Agrowon
आणखी पाहा...