Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain: ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता, अवकाळी पावसाचा धोका!

Cloudy Weather Impact: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या काढणीच्या पिकांसह द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला पिकांना कीड आणि रोगांचा धोका वाढला आहे. अवकाळी पाऊस अधिक झाला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर कीड, रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच मंगळवारी (ता. १) पहाटे राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. येत्या काळात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भीतीने जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस होत आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील वातावरणात वेगाने बदल झाले आहे. गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरुवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली होती. त्यातच अनेक ठिकाणी पिके काढणीच्या अवस्थेत आली होती.

काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरुवात झाली होती. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होण्यास सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार झाली असल्याने काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अगोदरच मागील चार वर्षांपूर्वी कोरोनामुळे अडचणीत आलेला शेतकरी अवकाळी पावसामुळे चांगलाच संकटाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.

...या पिकांचे होऊ शकते नुकसान

काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, हरभरा, ज्वारी.

भाजीपाला पिकांचेही मोठे होऊ शकते.

द्राक्षे, पेरू, डाळिंब पिकांचेही नुकसान होण्याची भीती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Special Relief Package: तमिळनाडूचा आदर्श

Gram Panchayat Elections: पुणे जिल्ह्यात ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; अंतिम प्रभागरचना जाहीर

Heritage Tourism: भीमाशंकरची ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असे गाव होणार : फडणवीस

Milk Adulteration Action: दूध भेसळविरोधी कारवाईला शेतकऱ्यांचा पाठिंबा

Paddy Farmers Issue: ‘या रोपांसोबत आमच्या आशाही करपून जातील!’; भातपट्ट्यातील शेतकऱ्यांची व्यथा

SCROLL FOR NEXT