Sangli weather agrowon
ॲग्रो विशेष

Sangli weather : सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण, द्राक्ष बागायतदारांना फटका बसणार का?

Weather Update : हिंदी महासागरात केरळपासून १४०० किलोमीटरवर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Sangli Rain : मागच्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये भितीचे वातावर पसरले आहे. सांगली जिल्ह्यात पाऊस होणार अशी चर्चाही होत आहे.

दरम्यान हिंदी महासागरात केरळपासून १४०० किलोमीटरवर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. तो सरकत केरळपासून ८०० किलमीटरपर्यंत जवळ येईल. त्याचे वादळात रूपांतर न होता तफावत कमी होत जाईल. असे सांगण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यात येत्या काही दिवसांत ढगाळ वातावरण राहिले, तरी १५ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही, असा अंदाज 'अॅमिकस अॅग्रो'ने आज जाहीर केला आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे. त्यांच्यासाठी दिलासा असल्याचेही सांगण्यात आले आहे.

'अॅमिकस अॅग्रो'ने म्हटले आहे, की अनुकूल वातावरणामुळे पुणे विभागात ४ पासून ११ तारखेपर्यंत वातावरण हलके ढगाळ होत असले, तरीही ५ ते ६ तासांपर्यंत सूर्यप्रकाश मिळू शकतो.

आपल्या भागात १५ जानेवारीपर्यंत वातावरण अधूनमधून ढगाळ झाले, तरीही पावसाची शक्यता नाही. जिल्ह्यात आगाप द्राक्षावर जीवाणूजन्य करप्याने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे.

मागास द्राक्ष फुलोऱ्यात असताना २५ ऑक्टोबरच्या पावसाने दणका दिला. जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर द्राक्षक्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील म्हणजे ५० हजार एकरातील द्राक्षांना फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT