Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण

Weather Update : खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. मध्यंतरी तब्बल ४० दिवस ढगाळ वातावरण होते. गेले सहा-सात दिवस बऱ्यापैकी थंडी होती. पण पुन्हा विषम वातावर तयार होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News :  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. मध्यंतरी तब्बल ४० दिवस ढगाळ वातावरण होते. गेले सहा-सात दिवस बऱ्यापैकी थंडी होती. पण पुन्हा विषम वातावर तयार होत आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला व मध्यात काही दिवस निरभ्र वातावरण होते. परंतु नोव्हेंबरच्या मध्यापासून ते आतापर्यंत ढगाळ वातावरण आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरणच नाही. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. कापसाची खेडा खरेदीदेखील थंड होऊ शकते. निरभ्र, कोरड्या वातावरणाची पिकांना गरज आहे.

नोव्हेंबरमध्ये २१ तारखेनंतर खानदेशात अनेक भागांत पाऊस झाला. यानंतर ढगाळ व पावसाळी वातावरण कायम होते. २३ नोव्हेंबरला रात्रीदेखील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जळगावमध्ये चोपडा, धरणगाव, जळगाव, एरंडोल, पाचोरा आदी भागांत मध्यम पाऊस झाला. काही भागांत हलकी गारपीट झाली.

नंदुरबार, धुळ्यात मोठी हानी झाली. धुळ्यातही धुळे, शिरपूर भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. अतिवृष्टी नंदुरबारातील २५ महसूल मंडलांत झाली. पावसाने रब्बीतील पिकांची पेरणी, केळीची काढणी, शेतात पडून असलेल्या चाऱ्याची वाहतूक रखडली होती. ही कार्यवाही पाऊस थांबताच सुरू झाली, परंतु दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे.

अनेक दिवसांपासून थंडीची प्रतीक्षा आहे. रविवारी (ता. १०) काहीसे कोरडे वातावरण व थंडी होती. पण सोमवारी (ता. ११) रात्री ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. थंडीअभावी रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. सततच्या विषम वातावरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण राहते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT