Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : अरबी समुद्रात ढगांची दाटी; जोरदार पावसाची प्रतीक्षा

Rain Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Team Agrowon

Maharashtra Monsoon News : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली असली, तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुखावून जात आहेत. पावसातील खंडामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

आज (ता. २७) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होत असून, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या (Rain) सरींना पोषक हवामान होत आहे. मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

त्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात होत आहे. मात्र पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे.

अरबी समुद्रातून मॉन्सून सक्रिय होत असल्याने दोन दिवसांत राज्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज (ता. २७) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :

कोकण :

रत्नागिरी : चिपळूण ५८, दापोली ६१, गुहागर ४५, लांजा ६०, मंडणगड ४०, राजापूर ६८, रत्नागिरी ८९, संगमेश्‍वर ४९, सुधागड ६०.५, वाकवली ५२.५.
सिंधुदुर्ग : आवळेगाव ८०, देवगड ५२, दोडामार्ग ४०, कुडाळ ७०, मालवण ९०, मुलदे (कृषी) ६७, रामेश्‍वर ५०, सावंतवाडी ९१, वेंगुर्ला ५४.

मध्य महाराष्ट्र :
जळगाव : बोधवड ४१.
कोल्हापूर : चंदगड २५, गगनबावडा ३०, राधानगरी २३, शाहूवाडी २९.
नंदूरबार : नंदूरबार ३५, तळोदा २५.
सातारा : महाबळेश्‍वर ३७.

विदर्भ :

बुलडाणा : बुलडाणा २१,
यवतमाळ : दारव्हा २१, नेर ३३.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT