Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Crop : विदर्भात वातावरणातील बदल-पाऊसमानाचा डाळिंबाला फटका

Pomegranate Production : विदर्भात वातावरणातील बदल आणि १००० मिमिपेक्षा अधिक पडणारा पाऊस त्यामुळे हे पीक शाश्‍वत ठरु शकले नाही, अशी माहिती सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.ए. मराठे यांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : डाळिंब हे मुख्यत्वे कोरडवाहू क्षेत्रातील पिक आहे. सरासरी ५०० मिलिमिटर इतक्‍याच पाण्याची त्याला गरज आहे. विदर्भात वातावरणातील बदल आणि १००० मिमिपेक्षा अधिक पडणारा पाऊस त्यामुळे हे पीक शाश्‍वत ठरु शकले नाही, अशी माहिती सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.ए. मराठे यांनी दिली.

एशियन सिट्रस कॉंग्रेसच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर असलेल्या डॉ. मराठे यांनी ऍग्रोवन सोबत संवाद साधला ते म्हणाले, कोरडवाहूपट्टयात येणारे किंवा कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारसीत डाळिंब पीक आहे. परिणामी ते विदर्भात तग धरु शकले नाही.

विदर्भात सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीचा प्रयोग केला. त्यांनी चांगले उत्पादनही घेतले. परंतु त्यानंतरच्या काळात क्‍लायमेट चेंजचा परिणाम होत गेला आणि त्याचा फटका डाळींबालाही बसला आहे.

या पिकासाठी सरासरी ५०० मिमि इतकेच पाणी गरजेचे आहे. विदर्भाच्या काही जिल्हयात १००० मिमि पेक्षा अधिक पाऊस होतो. त्यामुळे देखील हे पीक या भागात यशस्वी

होणार नाही. राज्यात सुमारे ७.८२ लाख हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर डाळिंब लागवड असताना विदर्भात हे क्षेत्र आजच्या घडीला केवळ २० ते ३० हजार हेक्‍टर इतकेच आहे. त्यामध्ये अकोला, बुलडाणा हे दोनच जिल्हे डाळिंब लागवडीत आघाडीवर आहेत किंवा या भागात हे पीक चांगली उत्पादकता देण्यास पूरक ठरल्याचे निरीक्षण आहे.

संस्थेने गेल्या काही वर्षात तीन नवे वाण दिले आहेत. त्यामध्ये शरद भोसले या शेतकऱ्यांकडील शरद किंग या निवड वाणाचाही समावेश आहे. भगवा या वाणापासून हे वाण मिळाले आहे. सोलापूर लाल आणि अनार दाणा हे वाण केवळ प्रक्रियेकामी वापरण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

Flower Farming Success : अभ्यासपूर्ण गुलाबशेतीतून आर्थिक स्थैर्य, समाधानही

Nutrient Management: चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

SCROLL FOR NEXT