Pomegranates Quality : गुणवत्तापूर्ण डाळिंबासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक

Pomegranate Farming : प्रत्येक झाडाची शरीरक्रिया व्यवस्थित टिकविण्यासाठी तिचे संतुलित पोषण झाले, तरच कोणतेही फळझाड रोग व किड प्रतिकारक्षम बनते. त्यासाठी संतुलित अन्नद्रव्याचे व्यवस्थापन महत्वाचे आहे.
Director, Maharashtra Agricultural Education and Research Council Speech
Director, Maharashtra Agricultural Education and Research Council SpeechAgrowon
Published on
Updated on

Solapur News : बदलत्या शेती पद्धतीचे मूळ हे जमीनच असून, प्रत्येक झाडाची शरीरक्रिया व्यवस्थित टिकविण्यासाठी तिचे संतुलित पोषण झाले, तरच कोणतेही फळझाड रोग व किड प्रतिकारक्षम बनते. त्यासाठी संतुलित अन्नद्रव्याचे व्यवस्थापन महत्वाचे आहे, असे मत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी व्यक्त केले.

कृषी विभाग, आत्मा व गुरुकृपा ॲग्री मार्ट, गौडवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गौडवाडी येथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची शेतीशाळा व किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॅा. कौसडीकर बोलत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Director, Maharashtra Agricultural Education and Research Council Speech
Agriculture Department Action : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित

भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, डॅा. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विनायक काशीद, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव शिंदे, मंडल कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री पाटील, अॅड. सचिन देशमुख, उद्यान पंडित राहुल रसाळ, नाआण्णा गडदे, कलाप्पा गडदे, शिवाजी हिप्परकर उपस्थित होते.

Director, Maharashtra Agricultural Education and Research Council Speech
Sugarcane Rate : साखर कारखानदारांकडून ऊसदराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न, चार कारखान्यांकडून दर जाहीर

डॉ. कौसडीकर म्हणाले, मानवप्राणी, सूक्ष्मजीव, जनावरे या प्रमाणेच जमीन ही सुध्दा सजीव घटक असून तिचा जिवंतपणा टिकवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे, असल्याचे ते म्हणाले.

Director, Maharashtra Agricultural Education and Research Council Speech
Onion Market News : खरीप कांदा आवक सुरू; दरात तेजीची शक्यता

डॉ. कुलकर्णी यांनी डाळिंब निर्यातीच्या संधीवर मार्गदर्शन केले, तर उद्यानपंडित रसाळ यांनी स्लरीचे महत्त्व याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी तालुक्यातील डाळिंबाची सद्यपरिस्थिती बाबत सांगितले. कार्यक्रमासाठी कृषी सहायक मयूर माळी, आर. डी. चव्हाण, समाधान गवळी, आत्माचे मेघराज पोळ, विक्रम वाघमारे, सौ. बनसोडे मॅडम, गौरव गावडे आदींनी परिश्रम घेतले.

बोर्डो मिश्रण प्रभावी बुरशीनाशक

रासायनिक खतासमवेत सेंद्रिय आणि जैविक खते डाळिंबाला दिली पाहिजेत. युरिया सारख्या रासायनिक खताचा किमान वापर करून अमोनियम सल्फेट या खताचा पर्यायी वापर करावा. बोर्डो मिश्रण हे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक असून बहार धरतेवेळी छाटणीच्या अगोदर व छाटणी नंतर याचा वापर होणे आवश्यक असल्याचे डॅा. कौसडीकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com