Ashadhi Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना निर्मल दिंडी पुरस्कार

Nirmal Dindi Award : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत आषाढी यात्रा कालावधीत ‘‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’’ सन २०१८ पासून सुरू करण्यात आला आहे. यंदाही पहिल्या तीन दिंड्यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Solapur News : आषाढी यात्रेतील सर्व सोहळ्यातील बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा. त्याच प्रमाणे इतर दिंड्यानीही त्याचा आदर्श घेवून या ‘‘निर्मल वारी, हरित वारी अभियान’’ मध्ये सहभाग घ्यावा.

या जाणिवेतून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत आषाढी यात्रा कालावधीत ‘‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’’ सन २०१८ पासून सुरू करण्यात आला आहे. यंदाही पहिल्या तीन दिंड्यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथमहाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.श्री. औसेकर महाराज म्हणाले, पंढरीची पायीवारी ही महाराष्ट्राची प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड राहण्यासाठी या परंपरेचे रक्षण व संवर्धन करणे हे आपल्या सर्व वारकरी वैष्णवांचे सर्व प्रथम कर्तव्य आहे.

हा पायीवारी सोहळा स्वच्छ, निरोगी व निरामय राखण्यासाठी या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यासारखे सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी हा पुरस्कार देण्यात येतात, असे औसेकरमहाराज म्हणाले.

आषाढी पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रक्कमेचा (प्रथम एक लाख, द्वितीय ७५ हजार व तृतीय ५० हजार) धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यासाठी ॲड. माधवी निगडे, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, वृक्षमित्र ह. भ. प. शिवाजीराव मोरे या मंदिर समितीच्या तीन सदस्याची समिती गठीत करण्यात आली असल्याचे सह अध्यक्ष औसेकर महाराज यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT