Question Papers Leak : राज्यात १० व्याच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरूवात झाली. त्यामुळे राज्य सरकारकडून कठोर पावलं उचले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु जालना जिल्ह्यात पेपरफुटीची घटना समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापुर येथे पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आणून त्याच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली आहे.
राज्यात शुक्रवारीपासून १० ची परीक्षा सुरू झाली आहे. शुक्रवारी पाहिला पेपर मराठीचा होता. या पेपरची वेळ सकाळी ११ ची होती. परंतु परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांतच प्रश्न पत्रिका केंद्राकहाय बाहेर आली. त्यामुळे बदनापुर येथील केंद्रावर गोंधळ निर्माण झाला.
झेरॉक्स सेंटरवरून थेट उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाकडून पेपर रद्द करण्यात येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शुक्रवारपासून दहावी बोर्डच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात १६ लाखपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.
या परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचा राज्य सरकारकडून दावा करण्यात येत आहे. परंतु जालन्यातील धक्कादायक प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, राज्यातील केंद्रावर गैरप्रकार घडू नयेत, यासाठी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अचानक पिंपरी चिंचवड येथील कै. अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात परीक्षा सुरू असताना केंद्राला भेट दिली. आणि कॉपीमुक्त अभियानाच्या आढावा घेतला. यावेळी त्यांनी वर्गाची प्रत्यक्ष पहाणी केली. तसेच केंद्र प्रमुखांना सूचना दिल्या. परंतु जालन्यातील कॉपी प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.