Citrus Fruit Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Citrus Fruit : लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

Citrus Fruit Management : प्रखर उन्हामुळे मागील वर्षी लागवड केलेल्या कलमांचे कोवळे शेंडे सुकणे, पाने गळणे असे परिणाम दिसून येतात. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी कलमांच्या दोन फूट परिघामध्ये बोरूचे बी पेरावे. हे वेगाने वाढून सभोवती सावली राहते.

Team Agrowon

डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे

Citrus Fruit Farming : प्रखर उन्हामुळे मागील वर्षी लागवड केलेल्या कलमांचे कोवळे शेंडे सुकणे, पाने गळणे असे परिणाम दिसून येतात. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी कलमांच्या दोन फूट परिघामध्ये बोरूचे बी पेरावे. हे वेगाने वाढून सभोवती सावली राहते.

आता तातडीने सावली करण्यासाठी तिन्ही बाजूला बांबू किंवा कामठ्या रोवून हिरव्या शेडनेट लावाव्यात. किंवा दक्षिण आणि पश्‍चिम बाजूने उपलब्ध तुराट्यांचा कूड करावेत. रोपांच्या भोवती किमान २ ते ३ फूट परिघामध्ये सेंद्रिय पदार्थांचे किमान १० सेंटिमीटर जाडीचा थर देऊन आच्छादन करावे.

पर्णोत्सर्जनाचा वेग कमी करण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे २०-२५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. मोठ्या बागांसाठी आच्छादनाचा वापर करतानाच प्रति झाड २-३ किलो गांडूळ खत द्यावे. पाण्याची तीव्र टंचाई असल्यास आंबिया बहर न घेता मृग बहराचे नियोजन करावे.

फळबागेवर बाष्परोधक २ टक्के तीव्रतेची केओलीनची किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ टक्का तीव्रतेची फवारणी करावी. ठिबक सिंचनाची सोय आवश्यक आहे. पण नसेल तर झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी दांड काढून आलटून पालटून ७ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा करावा. आळे केलेले असल्यास त्याचे दोन भाग करून एकाआड एक पद्धतीने पाणी द्यावे.

तापमान वाढ व उष्ण वारा यामुळे संत्रा, मोसंबी किंवा लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + युरिया (१ किलो) प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (*ॲग्रेस्को शिफारस)

डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७

डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२

(भारतीय समन्वयीत फळे संशोधन प्रकल्प,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Update : थंडी कायम राहण्याची शक्यता; राज्यातील किमान तापमानात चढ उतार राहण्याचा अंदाज

Land Acquisition Compensation: मोबदल्याशिवाय आम्ही जमीन देणार नाही

Natural Farming: केवळ एक देशी गाय असल्यास २१ एकरवर करता येईल नैसर्गिक शेती : अमित शहा

Agriculture Financing: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर

Banana Crop Insurance: तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादकांना पीकविम्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT