Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

Water Issue : सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे.
Water Issue
Water IssueAgrowon
Published on
Updated on

Sangli News : गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातही पाणीसाठा कमी आहे. सद्यःस्थितीला पाऊस सुरू होईपर्यंत पाणी कमी पडणार आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. त्यामुळे पाणी टंचाईमुळे ५० टक्के पाणी कपातीचा निर्णय संस्था पातळीवर घेतला असल्याने बारमाही पिकाचे क्षेत्र ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी नवीन पिके घेऊ नयेत, असेही सांगण्यात आले आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांत ३५०० हजार नोंदणीकृत सहकारी पाणी पुरवठा संस्था आहेत. संस्था कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या नदीतून पाणी उचलून संस्थेचे सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा केला जातो. त्याबदल्यात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारली जाते. या पाणीपट्टीवर या संस्था चालतात. गतवर्षी उन्हाळ्यात पाऊस झाला नाही. तर पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने या तीनही जिल्ह्यातील धरणे पू्र्ण क्षमतेने भरली नाहीत. त्यामुळे सप्टेंबरपासून पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे पाणीपुरवठा संस्थांना पाणी उचलण्यासाठी पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

Water Issue
Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

सागंली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळी कमी होऊ लागली. या गणपती, दसरा या दरम्यान, कृष्णा नदी तीन वेळा कोरडी पडली. तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीही कोरडी पडली होती. याचा फटका सहकारी पाणीपुरवठा संस्थांना बसला. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून या संस्थांकडून पाणी कपातीचे धोरण राबवण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोयनेतून सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी सर्वांनी केली. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला. सुरुवातीला पाण्याचा विसर्ग कमी होता. परंतु शेतीसाठी पाणी सातत्याने कमी पडू लागले. त्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाने टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्ग वाढवला. सध्या कोयनेतून ३३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पाणीपुरवठा संस्था उपलब्ध पाण्यावर सुरू आहेत. परंतु पाण्याची टंचाई लक्षात घेता संस्थांनी शेतकऱ्यांना बारमाही पिकाची लागवड करू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे या संस्थांच्या लाभ क्षेत्रात सुमारे ५० टक्के पिकाचे क्षेत्र घटले आहे. सध्या पाणीपुरवठा संस्था १० दिवस सुरू तर १० दिवस बंद अशा पद्धतीने सुरू आहेत. पाणी कपातीमुळे पिकांना वेळेत पाणी मिळत पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पाणी कपातमुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे.

सध्या लोकसभा निवडणूक सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीला पुरेसे पाणी आहे. त्यामुळे या संस्था पाणी उपसा करुन ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणीपुरवठा करत आहेत. मात्र, निवडणूक संपल्यानंतर अर्थात सात मे नंतर उपसाबंदी लावण्याची शक्यता असल्याचे इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उपसा बंदी लावू नये पाटबंधारे विभागाशी बैठक घेण्यात येणार आहे.

Water Issue
Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी
धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय संस्था पातळीवर घेतला आहे. पाणी कपात थांबवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.
रत्नाकर तांबे, संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर
सध्या पाणी टंचाईमुळे पाण्याची पाळी बसत नाही. या मे च्या पंधरावड्यापर्यंत पाणी पुरेल. त्यानंतर पाणी टंचाई भासणार आहे. कदाचित निवडणूक झाल्यानंतर उपसा बंदी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपसाबंदी लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
मारुती पाटील, सचिव, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com