Citrus Estate  Agrowon
ॲग्रो विशेष

Citrus Estate : राज्यातील सिट्रस इस्टेट दोन महिन्यांत होणार कार्यान्वित

Orange Farmer : गेल्या चार वर्षांपासून हे काम रेंगाळल्याने यातून अपेक्षित उद्देश साध्य होत नव्हता.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : संत्रा पट्ट्यातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचत त्या माध्यमातून उत्पादकता वाढ आणि दर्जा सुधार कार्यक्रमाला चालना मिळावी याकरिता पंजाबच्या धर्तीवर सिट्रस इस्टेटची संकल्पना मांडण्यात आली होती.

गेल्या चार वर्षांपासून हे काम रेंगाळल्याने यातून अपेक्षित उद्देश साध्य होत नव्हता. त्याची गंभीर दखल घेत येत्या दोन महिन्यांत सिट्रस इस्टेट पूर्ण गतीने कार्यान्वित करण्याचे निर्देश फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी दिले आहेत.

पंजाबमध्ये किन्नो उत्पादक बागायतदारांना दर्जेदार रोपांचा पुरवठा ते लागवड आणि विक्री अशा सर्वच टप्प्यांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सिट्रस इस्टेट ही संकल्पना साकारण्यात आली आहे. पाच कोटी रुपये बॅंकेत मुदती ठेवीनुसार जमा करण्यात आले. त्याचे व्याज आणि संत्रा बागायतदारांना देण्यात येणाऱ्या सशुल्क सेवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवर तेथे कामकाज चालते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सिट्रस इस्टेट उभारण्याचे ठरले.

परंतु गेल्या चार वर्षांत हे काम तसूभरही पुढे सरकले नाही. त्याविषयी ‘ॲग्रोवन’मधून बुधवारी (ता. ३) वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत शुक्रवारी (ता. ६) तडकाफडकी पुणे आयुक्‍तालयात बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत येत्या दीड ते दोन महिन्यांत सिट्रस इस्टेटचा कारभार गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ग्रेडिंग, पॅकिंगची सुविधा संत्रा उत्पादकांसाठी गरजेची आहे. काटोल (नागपूर) येथील ढिवरवाडी परिसरात ही सुविधा नव्याने उभारली जाणार आहे. तळेगाव (वर्धा) येथे कारंजा घाडगे येथील निर्यात सुविधा केंद्र तर हिवरखेड (मोर्शी, अमरावती)करिता मायवाडी येथील पणन मंडळाचे प्रक्रिया केंद्र अधिग्रहित करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्या ठिकाणी आवश्‍यक त्या संयंत्राची उपलब्धता केली जाणार आहे. कृषी सेवा केंद्र दीड महिन्यात कार्यान्वित करून संत्रा बागायतदारांना कमी दरात निविष्ठांची विक्री होईल. पाच कोटी रुपयांचा फिरता निधी देखील दिला जाणार असून, तो मुदती ठेवीत जमा करुन त्याच्या व्याजावर कामकाज चालविले जाणार आहे.

...या होणार सुविधा

शेतकरी प्रशिक्षण, मातृवृक्षांच्या आधारे दर्जेदार रोप तयार करणे, रोप विक्री, अवजार बॅंक, कृषी सेवा केंद्र त्यासोबतच ग्रेडिंग, कोटिंग आणि पॅकिंग अशा सेवा-सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत यातील शक्‍य तितक्‍या सेवा उपलब्ध करून द्या, असे निर्देश फलोत्पादन संचालक मोते यांच्याद्वारे देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे भरणार

अमरावती जिल्ह्यात दोन तर उर्वरित राज्यात छत्रपती संभाजी नगर, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत प्रत्येकी एक सिट्रस इस्टेट आहे. सिट्रस इस्टेटकरिता वर्ग दोन दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, असे आदेश आहेत.

छत्रपती संभाजी नगर वगळता उर्वरित ठिकाणी हे पद भरण्यात आलेले नाही. प्रभारीच्या माध्यमातून हा गाडा हाकला जात आहे. परंतु सिट्रस इस्टेटचा कारभार गतिमान करण्यासाठी लवकरच हे पद भरण्यात येणार आहेत, असेही बैठकीत सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT