Badlapur School Case Agrowon
ॲग्रो विशेष

Badlapur School Case : चिमुरड्यांवरील अत्याचारावरून नागरिकांचा उद्रेक

Badlapur Sexual Abuse Case : बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्या बालिकांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या प्रकरणानंतर मंगळवारी (ता. २०) नागरिकांचा उद्रेक झाला.

Team Agrowon

Mumbai News : बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्या बालिकांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या प्रकरणानंतर मंगळवारी (ता. २०) नागरिकांचा उद्रेक झाला. बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी रेल्वेसेवा बंद पाडली.

तसेच शाळेवर मोर्चा काढून दगडफेकही केली. आंदोलनामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आणि लांब पल्ल्याची वाहतूक आठ तासांहून अधिक काळ ठप्प झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी लाठीहल्ला करून जमाव पांगवला.

दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवू, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्याबद्दल बदलापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित केले आहे.

तर शाळेने मुख्याध्यापिकेचे निलंबन केले असून, काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. बदलापूर येथील आदर्श विद्यालयात १२ आणि १३ ऑगस्ट रोजी तेथील कर्मचाऱ्याने शाळेतच लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण घडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे.

महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषा

या घटनेचे वार्तांकन करण्यास गेलेल्या महिला पत्रकाराला शिंदे गटाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरली. तुम्ही लोकांना भडकवता. जणू काही तुमच्यावरच बलात्कार झाल्यासारख्या बातम्या देता अशी संतापजनक भाषा त्यांनी वापरली.

बदलापूरमधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात येईल.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT