Monsoon Rain : नांदेडला मध्यम, लघू प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Waiting for Rain : नांदेड जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत ६१.२० टक्क्यांनुसार ४४५.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जून ते आजपर्यंत ५२७.३० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ९९.९६ टक्क्यांनुसार ५२७.१० मिलिमीटर पाऊस झाला. असे असले तरी, शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी व मानार हे दोन मोठे प्रकल्प वगळता मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये अद्याप जलसाठा झाला नाही. यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत ६१.२० टक्क्यांनुसार ४४५.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सक्रिय झाला. सातत्याने रिपरिप तर शेवटच्या टप्प्यात ३१ जुलैला पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, ऑगस्ट या पंधरा दिवसांत तुळक ठिकाणी पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.

Monsoon Rain
Waiting for Rain : तापलेल्या जमिनीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा

त्यामुळे उन्हाचे चटके जाणवत होते. बुधवारी (ता. १४) कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअसवर व किमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दुपारी उकाडा तर, रात्रीच्यावेळी गार हवा सुटत आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. १६) अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कमाल तापमानातही तीन अंशांनी घसरण झाली. तर, सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, या पंधरा दिवसांत प्रकल्पक्षेत्रात म्हणावा तसा दमदार पाऊस झाला नाही. प्रमुख व मोठा प्रकल्प असणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात शुक्रवारी (ता. १६) ७६.९१ दलघमी (९५.२० टक्के) तर, मानार प्रकल्पात ९९.४० दलघमी (७१.९२ टक्के) पाणीसाठा झाला. ८० लघू प्रकल्पांत १०१.३० दलघमी जलसाठा (कंसातील टक्केवारी) उच्च पातळी ९ बंधाऱ्यांपैकी नांदेडमधील आमदुरा १४.६१ दलघमी (६२.९७), धर्माबादमधील बाभळी १.१५ दलघमी (२.६०), उमरीतील बळेगाव ३५.६० दलघमी (८७.३०) हे तीन प्रकल्प वगळता, नांदेडमधील आंतेश्वर, शून्य तर,

Monsoon Rain
Waiting for Water : कळंबीतील चारशे एकर क्षेत्र पाण्याच्या प्रतीक्षेत

माहूरमधील मारेगाव ०.०१ (०११ टक्के), दगडी ०.१८ (१.७२), किनवटमधील मोहपूर ०.६७ (६.९१), येंदा ०.२३ (२.६१), हिमायतनगरमधील मंगरूळ १.१ (०.१४) दलघमी पाणीसाठा आहे. तसेच मध्यम ९ प्रकल्प असून मुखेडचा कुंद्राळा १०.४१ दलघमी (१००), देगलूरमधील करडखेड ११.०२ (१००) दलघमी, उमरीतील कुदळा ४.३५ दलघमी (१००), कंधारमधील पेठवडज ७.०३ दलघमी (७७.७६), महालिंग ००, लोह्यातील उर्ध्वमानार १३.५० दलघमी (१७.८३), किनवटमधील नागझरी ६.५७ दलघमी (१००), लोणी ८.३८ (१००) दलघमी, डोंगरगाव प्रकल्पात ८.८१ दलघमी (१००) पाणीसाठा आहे. लघू ८० प्रकल्पांत १०१.३० दलघमी (५८.६२) जलसाठा झाला आहे.

१०४ प्रकल्पांतील जलसाठा

१३ प्रकल्प जोत्याखाली

२६ प्रकल्पांत १ ते २५ टक्के साठा

११ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के साठा

१२ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के साठा

१३ प्रकल्प ७६ ते १०० टक्के

२८ प्रकल्प १०० टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com